*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*बरकत…(माय)*
माय दिवाईना दिवा लखलखता प्रकाश
डवरन्यात चांदन्या उजयनं हो आकाश
तिन्या दोन चंद्रज्योती लाख दिवासले भारी
ते येताच घरम्हा पडे उजाये हो दारी ….
तिना वाचून उजाड घर वाढगं नि मया
ज्याना घर ना लक्षुमी संसारनी जास रया
जठे जठे फिरे हात तठे तठे बरकत
झेंडा घरना ती माय दिमाखमां फडकसं …
लक्षुमीना अवतार देव ठेवे घरोघर
तिना हातम्हा परीस बठ्ठ करे बरोबर
तिनी चाहूल घरम्हा घर गलगल बोले
तिना डोयानी पापनी देखीसन घर चाले..
तिनी मयानी पाखर पदर तो ऊबदार
दिसताच संकट ती जनू बनी जास घार
तिना कपायना कुकू खानदाननी ती खून
घरघरम्हा फिरस माय माय माय धून…
येता जाता पुसतसं माय कोठे माय कोठे
जनू मनले धिवसा घरम्हान देव भेटे
तिना मनना गाभारा सदा प्रेम वसांडस
एक एक दागिना ती जनू प्रेमना घडस…
माय भेटेना हो कोठे तिले जतन करा ना
पुन्यायीनी ती घागर घरम्हाज हो भराना
नका करू तीर्थयात्रा तुमना घरम्हा से देव
म्हनूनच देवनी ती ठेवी घरोघर ठेव…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २३/१२/२०२२
वेळ: दुपारी ३/०१