– सोमनाथ रसाळ
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा नियोजन समिती मार्फत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते.या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले.
महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय संवर्गातील वधूच्या आईला रुपये 10 हजार इतक्या अनूदानाचा लाभ देण्याची योजना या कार्यालयामार्फत राबविण्यात येते.
सुधारीत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता. सरळ विवाह नोंदणी कार्यालयात ( Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत विवाह Registered Marriage) करतात त्यांना सुध्दा रुपये 10 हजार इतके अनुदान देण्यात येते.
शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील वधूच्या आईला शुभमंगल सामूहिक,नोदणीकृत विवाह, तसेच निराधार, परितक्त्या आणि विधवा महिलेच्या दोनमुलीच्या विवाहास योजनेचा अटी व शर्ती खलीलप्रमाणे आहेत. वधू व वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. वधूचे वय 18 व वराचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. वधु-वरांना प्रथम विवाहासाठीच अनुदान देय असेल, तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान देय राहील. निबंधक विवाह नोंदणी यांचेकडील विवाह नोंदणी प्रमाणपत्र. लाभार्थी हा शेतकरी कुटुंबातील असल्याचा पुरावा म्हणून 7/12 चा उतारा किंवा लाभार्थी हा शेतमजूर असल्याचा पुरावा म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला. लाभार्थीचे उत्पन्न रुपये एक लाखाच्या आत असावे, पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला आवश्यक.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमुक्त मागास प्रवर्गातील दाम्पत्यांना इतर विभागाकडून विवाह योजनेचा लाभ मिळत असल्याने शासन निर्णयानुसार या प्रवर्गातील दाम्पत्ये या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत. फक्त खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील तसेच निराधार,परितक्त्या आणि विधवा महिलेच्या दोनमुलींच्या विवाहास वधूच्या आईला या योजनेचा लाभ दिला जाईल.