सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या मागणीला यश..
दोडामार्ग
० ते २० पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण गवस यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला यश आले आहे.
अनेक ठिकाणा वरून ० ते २० पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली जात होती. अनेक ठिकाणा वरून विरोध दर्शविला जात होता. अनेक संस्था तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते याबबत संबंधीत विभागाचे लक्ष वेधत होते.
याबाबत राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत तसेच राज्यात जवळपास ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार अशी महत्वपूर्ण घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.