कणकवली
कलमठ सरपंचपदी निवडून आलेले संदीप मेस्त्री व सदस्य यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभी मुसळे, शिशिर परूळेकर, संजय कामतेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संदीप मेस्त्री यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेच्या सरपंच पदाचे उमेदवारापेक्षा मोठे मताधिक्य मिळवल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी संदीप मेस्त्री यांचा विशेष सत्कार केला.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप मेस्त्री हे सदस्य पदासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. गेली अनेक वर्षे संदीप मेस्त्री हे राणे कुटुंबियांशी प्रामाणिक असून ते राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या विजयाबद्दल श्री. नलावडे यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभी मुसळे, संजय कामतेकर,शिशिर परूळेकर, मिलिंद मेस्त्री, विनिता बुचडे, महेश लाड, महेश सावंत, विजय चिंदरकर, नवनिर्वाचित सदस्य पप्पू यादव, स्वप्नील चिंदरकर, बाबू नारकर, अमजद शेख, आबा कोरगावकर, अमोल चिंदरकर आदी उपस्थित होते.