You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी मतदार संघात रस्ते विकासासाठी आणले 53 कोटी

आमदार नितेश राणे यांनी मतदार संघात रस्ते विकासासाठी आणले 53 कोटी

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी केलेली मागणी शिंदे -फडणवीस सरकारने तातडीने पूर्ण केली आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासासाठी तब्बल 53 कोटी 10 लाखा रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी आमदार नितेश राणे यांच्या विनंती नंतर अर्थसंकल्पीय तरतुदीतून तातडीने मंजूर करून दिला आहे.

कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातून कोल्हापूर कडे जाणारे प्रमुख घाटमार्ग त्याचप्रमाणे देवगड ,मालवण या पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तालुक्यांनाही जोडण्यासाठी विशेष बाब म्हणून आमदार राणे यांनी रस्ते मंजूर करून घेतले आहेत. यात आचरा -वरवडे कणकवली, विजयदुर्ग वाघोटन, हे मार्ग तसेच खारेपाटण गगनबावडा,देवगड निपाणी, कनेडी -सांगवे मार्गे शिवापूर -शिरशिंगे दानोली या सह्याद्री मार्ग साठी सुद्धा शिंदे – फडणवीस सरकार कडून निधी घेतला आहे. दरम्यान या विकास निधीसाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड हे कागदोपत्री पाठपुरावा करून टेंडर प्रक्रिया करून रस्ते विकासाला चालना देण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
५३ कोटी १० लाख मंजूर झालेल्या निधीतून पुढील प्रमाणे कामे होणार आहेत.

१)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड निपाणी रस्ता रा.मा. १७८ कि.मी. ५६/०० ते कि.मी. ६६/०० मध्ये सुधारणा करणे.
रक्कम(२ कोटी ५० लाख)

२)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील कनेडी सांगवे कुपवडे- कडावल नारूर वाडोस शिवापूर शिरीशिंगे कलंबिस्त वेर्ले सांगेली धवडकी दाणोली विलवडे बांदा सह्याद्री राज्यमार्ग १९० कि.मी. ०/०० ते २/०० रूंदीकरण व डांबरीकरणासह कॉक्रीट गटर करणे.
रक्कम(२ कोटी)

३)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील विजयदुर्ग वाघोटण तरळा गगनबावडा कोल्हापूर रेंदाळ रस्ता रा.मा. १७७ कि.मी. ०/०० ते २२/३०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम(२.कोटी ५० लाख )

४)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी रस्ता रा.मा. १७८ रस्ता ४०/४०० ते ४५/००, ४९/६०० ते ५१/८००, ५३/५०० से ५६/०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे.
रक्कम(२ कोटी ५० लाख)

५)सिंधुदूर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गगनबावडा कोल्हापूर राज्य मार्ग १७१ कि.मी. ०/०० ते २/००, ४/७०० ते ५/५०० व १०/५०० ते १२ / ५०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम(२कोटी ४५ लाख )

६)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गगनबावडा कोल्हापूर राज्य मार्ग १७१ कि.मी. १५/८०० ते १७/५०० व १७/६०० ते २०/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम(२ कोटी ४० लाखा)

७)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गगनबावडा कोल्हापूर राज्य मार्ग १७१ कि.मी. २०/०५० ते २०/३०० व २२/०० ते २५ / १०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम(२ कोटी ५० लाख)

८)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण गगनबावडा कोल्हापूर राज्य मार्ग १७१ कि.मी. ३०/०० ते ३४ / १०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम(२ कोटी ५० लाख)

९)सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील आचरा वरवडे कणकवली रस्ता रामा १८१ कि.मी. २३/०० ते ३८/०० मध्ये सुधारणा व कॉक्रीटीकरण करणे. याला विशेष तरतूद केली आहे.
रक्कम(३३ कोटी ७५ लाख )
एकूण रक्कम ५३ कोटी १० लाख रुपये आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघात महत्वाच्या रस्त्यांसाठी आणले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा