You are currently viewing बाईपण

बाईपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाईपण*

*बाईपण…..बाईपण..*
*तुझे…माझे बाईपण*
*किती सोसले सोसले*
*त्याचे..तिचे आईपण ll१ll*

*जातो दिवस झोकात*
*रांधा, वाढा, उष्टी काढा*
*सांगे रात्र उशापाशी..*
*वाच, उद्या हाच पाढा ll२ll*

*म्हणे भ्रतार मजला..*
*काय उणे तुला राणी?*
*किती सुखाने दळते*
*माझ्या संसाराची गाणी ll३ll*

*दावू कशी खंत कुणा*
*जाड धरली खपली*
*बंद पापणीत माझ्या*
*कैक गुपितं लपली ll४ll*

*किती जाहल्या निर्भया*
*किती उठल्या किंकाळ्या*
*आल्या तशा गेल्या वेळा*
*बांधुनिया फिती काळ्या ll५ll*

*मन रडे वास्तवात*
*नेसुनिया बाईपण*
*करी हासून साजरे*
*दुसऱ्यांचे क्षण सण ll६ll*

*सौ. संजना विद्याधर जुवाटकर*
*कळवा, ठाणे.*
*मोबा. ७७१०८३२२३०*

प्रतिक्रिया व्यक्त करा