युवा सेनेचे समीर नाईक यांची राजकारणाला सोडचिट्टी : लवकरच राजीनामा देणार असल्याचे केले स्पष्ट
सावंतवाडी
कधीही पक्षीय राजकारण न करता रात्री-अपरात्री प्रत्येकाच्या वेळप्रसंगाला धावून जात सहकार्य केले. जिवाची पर्वा न करता गंभीर रुग्णांना घेऊन सुद्धा दवाखान्यापर्यंत गेलो. परंतु ज्यांच्यावर भरोसा ठेवला त्यांनीच गद्दारी केली असे सांगत आपण सर्वच राजकारणाला सोडचिट्टी देत असल्याचे युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी सांगितले.
श्री.नाईक म्हणाले की, गेली दहा वर्षे केणीवाडीतील सामाजिक कार्यात पुढाकार घेतला. ग्रामस्थांना अपेक्षित काम केले. केवळ एका वाडीचाच विचार न करता संपूर्ण गावासह परिसरातील नागरिकांच्या मदतीला स्वतःचा कामधंदा बाजूला ठेवत वेळ, कार्य, प्रसंगाला धावून गेलो. परराज्यात नोकरी करणाऱ्यांच्या एका फोनवर आपण त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात नेले. परंतु ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी आपलेच गद्दार निघाले. अशा गद्दारांना सहकार्य किंवा मदत करण्यापेक्षा राजकारणातूनच संन्यास घेतलेला बरा असे समीर नाईक यांनी सांगितले. तसेच लवकरच आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचेही ते म्हणाले.