You are currently viewing वैश्यवाडा येथील प्रदीप सुकी यांचे निधन

वैश्यवाडा येथील प्रदीप सुकी यांचे निधन

सावंतवाडी

वैश्यवाडा येथील प्रदीप कॅटरर्सचे मालक प्रदीप सुकी यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. कॅटरिंगसाठी भांडी भाड्याने देणे तसेच कोकम, अननस सरबत यांची घाऊक विक्रीचा ते व्यवसाय करत. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, प्रकाश सुकी, दिवाकर सुकी, मिलिंद सुकी यांचे ते भाऊ तर सावंतवाडी वैश्य समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. विद्या सुकी, माजी नगरसेविका सौ.शुभांगी सुकी यांचे ते दिर होत. धीरज व गजानन सुकी यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा, मुलगा अक्षय तसेच भाऊ, वाहिन्या, पुतण्या असा मोठा परिवार आहे. सायंकाळी ५ वाजता त्याच्यावर अंत्यविधी होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा