*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संगिता काळभोर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घाई नको करु..*
गेल्यावर शब्दांच्या दुनियेत
शब्द बिलगू लागतात
नकळत समजते मनातले
मन ओळखू लागतात
कधी होता भाव अनावर
शहारेही आणतात
मी आहे ना म्हणतं
अंतःकरण ही जाणतात
सोबत करुन मायेची
आप्त सखेही बनतात
दिसता डोळ्यात आर्जवे
बिनबोभाट हात धरतात
चाल म्हणतात सावकाश
घाई नको करु
मी असल्यावर सोबतीला
कोणा नको स्मरु…..
मी माझी…..
सौ.संगीता मनोहर काळभोर.
मुंबई ,कुर्ला ..