६३ मतांनी सरपंच पदाचे उमेदवार विजयी; तर सदस्य पाच विरुद्ध चार…
बांदा
अपेक्षेप्रमाणे भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी मडुरा ग्रामपंचायती वरील सत्ता कायम राखली आहे. भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार उदय चिंदरकर यांनी ५८८ इतकी मते मिळवित प्रतिस्पर्धी गाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रितेश गवंडी (५२५) यांचा ६३ मतांनी पराभव केला. तर भाजपा पुरस्कृत पॅनलचे ५ व गाव परिवर्तन पॅनलचे ४ सदस्य निवडून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.
निवडणुकीचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, थेट सरपंच उमेदवार
१)उदय साबासेठ चिंदरकर (५८८ मते)
२)प्रितेश उत्तम गवंडी (५२५ मते)
३) नोटा (१८ मते)
प्रभाग क्रमांक १
१)कृष्णा लक्ष्मण गावडे (१९६ मते)
२)उल्हास उत्तम परब (१७२ मते)
३)रेश्मा रमेश परब (१९६मते)
४)स्वप्नाली उल्हास परब (२०२मते)
५)दिपाली दिलीप परब (१८५ मते)
६)जस्मिता लिंगाजी जाधव (१५६ मते)
७) नोटा (३० मते)
प्रभाग क्रमांक २
१) अमोल सदाशिव मेस्त्री (२४३ मते)
२) संदिप मोहन परब (१८४ मते)
३) पल्लवी पांडुरंग सातार्डेकर (२५६ मते)
४) प्रतिक्षा प्रकाश शेट्ये (१७२ मते)
५) सचिन सोमा जाधव (२३६ मते)
६) राकेश उत्तम जाधव (१८७ मते)
७) नोटा (३६ मते)
प्रभाग क्रमांक ३
१) विनिता विलास पावसकर (१४० मते)
२) संचिता सचिन धुरी (१७१ मते)
३) अंकिता आनंद धुरी (१३६ मते)
४) मीरा बाळकृष्ण प्रभू (१५५ मते)
५) राजाराम सावळाराम केरकर (११२ मते)
६) समीर आत्माराम बुगडे (१९० मते)
७) नोटा (१८ मते)
सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी सरपंच सुरेश परब, शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी अभिनंदन केले.