You are currently viewing सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित सायकल रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित सायकल रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद

आंबोली

सैनिक स्कूल, आंबोली मध्ये रविवार दि. १७ डिसेंबर रोजी भव्य अशा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सैनिक स्कूल, आंबोली ही शाळा नेहमीच आपली सामाजिक बांधिकालकी जपत समाजातील विविध घटकांसाठी नव नवीन उपक्रम राबवित असत. या मधील ‘सायकल रॅली’ हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम शाळेने राबविला आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले उद्घान सावंतवाडी येथून या रॅलीची सुरूवात झाली. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव मा सुनिल राऊळ, संचालक श्री जॉय डॉन्टस कार्यालयीन सचिव दिपक राऊळ आणि इतर मान्यवर आणि सहभागी सायकल स्वार उपस्थित होते. ही रॅली सकाळी ठिक ०६.३० वा सुरू झाली. सावंतवाडी ते आंबोली सैनिक स्कूल असा ३२ किमी अंतर रॅली साठी निश्चित करण्यात आले होते.

रॅलीच्या दरम्यान सायकल स्वारासाठी दाणोली नालापाणी आंबोली धबधबा प्रगती धाबा, पेडवेवाडी येथे स्टॉल्स उभारले होते. या स्टॉलवर त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवले होते. ही रॅली अतिशय सुरक्षित व्हावी म्हणून पायलट आणि अॅम्ब्युलन्स ची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
आंबोली सैनिक स्कूल या रॅलीच्या अंतिम स्थळी अतिशय देखणी स्टेज व्यवस्था तसेच स्नॅक्स रिफेशमेन्ट व्यवस्था करण्यात आली होती. सर्व सहभागी सैनिक स्कूल मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा गुण गौरवाचा कार्यक्रम थाटामाटात
करण्यात आला.

या गुण गौरवाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर लॉरेन्स फर्नांडीस सहपत्नीक उपस्थित होते. ते सद्या दिल्ली नेव्हल हेड क्वाटर येथे कार्यरत आहेत. त्यांनी २८ वर्षे यशस्वी रित्या देश सेवा बजावली आहे. शाळेचे पेट्रान बिग्रडियर सुधीर सावंत, अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी ५५ सायकल स्वारांना सर्टिफिकेटस् आणि मेडल देवून गौरव करण्यात आला. यामध्ये तीन मुलींनी देखील सहभाग घेतला होता. नितेश गोंड हा सायकल स्वार हा २.०८ तासांनी ही रॅली पुर्ण केली आणि प्रथम रॅली पुर्ण करण्याचा मान मिळवला.

उपस्थित सायकल स्वारांना कमांडर लॉरेन्स फर्नांडीस यांनी सुभेच्छा देत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना देखील बहुमोल असे मार्गदर्शन केले. नजीर शेख आणि जयप्रकाश परब या सायकल स्वारांनी आपले मनोगत व्यक्त करत रॅलीचे आयोजन अतिशय शिस्तब्ध झाले असे उद्गार काढले. रूची सावंत मॅडम नी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘डिझाईन थिंकींग’ याविषयावरती मार्गदर्शन केले. तसेच ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कोविड योदधांना समर्पित सायकल रॅली ही अतिशय उत्साहात आणि नियोजनब्ध रित्या संपन्न झाली. सायकल रॅलीमध्ये ५५ सायकल स्वारांनी सहभाग दर्शविला. सर्व सायकल स्वारांना मेडल व सर्टीफिकेट देवून सन्मानित करण्यात आले. सदर रॅलीमध्ये सर्व वयोगटातील सायकल स्वारांनी सहभाग घेतला तसेच तरुणींचा सहभाग सुध्दा उल्लेखनीय होता. एकूण ३२ किमी रॅली सर्व सायकल स्वारांनी पुर्ण केली व पुन्हा परतीच्या प्रवासात ३२ किमी अंतर पार केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर लॉरेन्स फर्नांडीस, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, अध्यक्ष पी. एफ डॉन्टस . सचिव सुनिल राऊळ, संचालक श्री शंकर गावडे, श्री शिवाजी परब, श्री जॉय डॉन्टस, सभेदार मेजर गावडे साहेब, परब सर, दिपक राऊळ, मुख्याध्यापक श्री. एस. टी. गावडे आणि इतर मान्यावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. हंबीरराव अडकूरकर आणि एम. एम. देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा