*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रितवेडी*
झाडाच्या बुंध्याला एकटक बसली,
गालावर खळी जशी गुलाबाची कळी.
झाडाची फांदी तिच्या केसाला भिडली,
कशी ग प्रीती तुझी त्यावर जडली.
सांगतेग तुला नको करूस बोभाटा,
आज प्रीतीनग,मनी घातला गोंगाटा.
जशी वृंदावनाचि शोभा वाढवी मोर,
मेघाच्या विरहात चातकाचा शोर.
जशी बागेची ग शोभा वाढवी पाखरू,
ममतेच्या पोटी ओढ घेई वासरू.
जशी पतंगाची शोभा वाढवी शशी,
निद्रेला ग अप्रूक मातेची ग कुशी.
तसे त्याचे ग येणे जसा दरवळे सुगंध,
आज प्रीतीलाग माझ्या आवरेना बंध……………..
संजय माकोणे 9623949907