वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने पुरुष रस्सीखेच स्पर्धा आणि शालेय गटासाठी (मुले) स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी श्री जैतीर मंदिर तुळस च्या मैदानावर दुपारी ठीक ४.०० वा. करण्यात आलेले आहे.
खुला – पुरुष गटासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु.४०००/- व रु. २०००/- प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक असून शालेय गटासाठी रु.१०००/- व रु. ७००/- प्रत्येकी चषक आणि सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. खुला पुरुष गट स्पर्धेतील बेस्ट फ्रंट मेन आणि बेस्ट लास्ट मेन यासाठी प्रत्येकी रोख ₹ ५००/- चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सर्व स्पर्धकांनी ओळख पुरावा म्हणून आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे.तरी इच्छुक संघानी अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर (७८७५८२८५८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.