सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७० टक्के मतदान झाले. थेट सरपंच पदासाठीच्या ७९० तर सदस्य पदासाठीच्या चार हजार ६४९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान यंत्रे सीलबंद करून त्या त्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली.आता निकालाची उत्सुकता लागून राहिली असून मंगळवार २० डिसेंबरला १० वाजल्यापासून त्या त्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. फक्त कुडाळची मतमोजणी कुडाळ हायस्कूलमध्ये तर मालवणची मतमोजणी तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ९ हजार मतदार आहेत. त्यामधून एकूण ७० टक्के मतदान झाले आहे. मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१.सावंतवाडी – ७५ %२
२.वेंगुर्ले – ७०.८९ %
३.दोडामार्ग – ६८.१० %
४.कुडाळ – ६६ %
५.मालवण – ७५ %
६.कणकवली – ७० %
७.वैभववाडी – ६६.२२ %
८.देवगड – ६५ %
*एकूण – ७०%*