*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ज्याचा त्याचा आनंद*
पिक पाणी यथास्थित
भाव योग्य बाजारात
कृषीवल सुखावला
घरदार आनंदात
बेरोजगारीचा सल
प्राप्ती जरी पदवीची
मिळे छोटीशी नोकरी
उठे लहर खुशीची
लेक नांदते सासरी
आहे सुखात बघून
मायबाप निवांतसे
चिंता नसे मनातून
झाली सांजवेळ तरी
पुत्र-स्नुषा ठेवी मान
साय दुधावरचीही
देती खूप समाधान
वयापल्याडही उर्मी
शिकण्याची,सृजनाची
यश मिळताच होई
पखरण आनंदाची
आनंदाच्या विषयांचे
किती वैविध्य जीवनी
झोपडीत-महालात
ज्याच्या त्याच्या मनोमनी
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334