*स्नेहल प्रकाशन परिवार समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी लिखित अप्रतिम कथा*
*पोस्टमन*
संच्याच सात वाजल असतील नसतील, दिवस मावळतिकडे झुकत हुता. सगळीकडे कामाची गडबड सुरू हुती, कोणी म्हसरांचं धारा काढीत हुत. कोणी दळाप घेवून गिरणी कड चाललं हुत , समोरच्या पारावर म्हातारी कोतारी बसली हुती, चीलमी चा धूर निघत हूता, चिलीम ह्या हतातन त्या हातात फिरत हुती.
पोरं टोर मधीच गलका करीत हुंदरत हुती तेवढ्यात कोणतरी आपली फट फटी वरून जनावराचा वैरण अणीत हुता . त्याच एक चाक अडव पडलेल्या कुत्र्या च्याच शेपटी वरून गेलं ,तस कुत्र केकटत मुलांच्या घोळक्यात शीरल, तशी मुल घाबरली व धावपळ चालू झाली.
त्यातल एक पोरग गटारीत पडल.
तशी सगळी जन नाम्याला शिव्या घालीत हुतं नाम्या चावडी वरचा शिपाई, त्याला गावात पाणी सोडणे व खांबावर फ्यूज घालून सिटी लाईट चालू करण्याचा मान हुता .तसा निरोप गेल्यावर नाम्या सायकल घेवून आला व एकाच डोळ्याने त्यांनी सिटी लाईट चालू केली. एक डोळ्यात फुल पडलं हुत, रस्त्यावर उजेड पडला तस सगळी च मुल गलका करू लागली
चावडीच्या म्होर डांबर कट्टा हुता , आता त्याला डांबर कट्टा का म्हणत्यात ते कुणालाच माहिती नव्हतं .त्या डांबर कट्ट्यावर गावच पाटील अन चावडी तला शिपाई गणु बसला हुता. तस ज्योतगोंड पाटील हे पोलीस पाटील पण चावडी सोडुन ते डांबर कट्ट्यावर येऊन बसल हुत , काम बी तेवढच महत्वाच च , म्हणुन ते पारा वर येऊन श्यान बसलं हुत. काम अस हुत की ते कुणाला सांगता बी येत नव्हतं नी स्वतः बी करायला ते तस जड च हुत . पाटलांचं काम म्हणजे जंक्शन च की !
पाटील आठवड्यात एक दोन वेळा का हुईना शेवंतां माळी च्या घरी पाहुणचार घेण्यास जात . असच एकदा शेवंतां कड गेलं असता , शेवंतां तरातरा बाहेर आली , आत्ता ग बया हे काय अकरीतच की पाटील आज दिवसा ढवळ्या इकडं कुठं येन झालं म्हणायचं सरकारचं !
पाटील हे काय खुळ्या वानी काय निरोप न्हाय सांगावा न्हाय कस काय येन केलसा बाई !
तस पाटील जरा गालातल्या गालात हसले अन शेवंतां न दिलेल्या ग्लासभर पाणी एकदम च गळ्या आड केलं . तस शेवंतां चहा करायला आत गेली , पटक्या च्या शेमल्यानी तोंड व मिशी पुसून घेतली . शेवंतां लगेच एका हातात भडंगा ची प्लेट
व एका हातात चहा चा ग्लास घेऊन आली .
पाटलानी एक मूठ भडंग अन एक घोट चहा असा फराळ चालु केला , तस खोल विषयाला हात घालत म्हटले हे बघ शेवंतां तुला हांतराया जाजम ची ऑर्डर देऊन आलोय मिरजला . अन तुझ्या नावा वर पार्सल करायला बी दुकानदाराला त्याच येगळ पैस बी देऊन आलोय .
तस शेवंता एकदम लाडात येऊन म्हणाली ते अन कश्याला एक गादी दिलासा ती फुर हाय की , त्यावर पाटील म्हटलं तस नाय अवंदा पाऊस लै झालाय म्होर थंडीत उपेगी ईल की , जावा काय बी तुमचं एकेक .
तस पाटील जरा इना कारण खाकरून म्हटले त्यो पोष्टमन बाबसाब ईल तवा त्याच्या मागावर राहून पार्सल घे न्हाय तर त्यो जरा धांदरट हाय , तवा लक्ष ठेवून श्यान ते अदुगर घे मग तु इकडं तिकडं हिंडत बैस त्याचा येण्याचा वकुत काय खर न्हाय . व्हय व्हय की अस शेवंतां म्हणली खर पण पोष्टमन बाबसाब कुठल्या तंद्रीत कुठं माल पोहचवल हे काय सांगता यायचं न्ह्याय . अस सगळं झांगट हुत म्हणून
पाटील डांबरी कट्ट्यावर ठाण मांडुन बसलं हुत , कारण पोष्टमन बाबासाहेब ह्याच रस्त्यावरन जाणार हे पाटील च काय सगळ्या ना ठाऊक होतं . राम राम पाटील साब करत कदम तात्या आले अन न राहूनश्यान त्यानी म्हटलं पाटील चावडी सोडून डांबरी कट्ट्यावर कस आलासा . चला चावडीवर जाऊन बसु अस म्हटल्यावर पाटलांना जागा नाईलाजाने सोडावी लागली . अन चावडीत येऊन बसायला पोष्टमन बाबसाब घरा बाहेर पडला.
बाबा साब म्हणजी गावचा पोस्टमन ह्यो पठ्ठ्या सकाळी अँकलीं वरून सकाळी 9 वाजता आणलेली डाक घेवून घरी टाकायचा नंतर न्याहरी करून नीट शेतात जावून दिवस भर शेती काम करून येताना भला जंग वैरण बिंडा घेवून दावणी त आणून टाकला की मग अंघोळ नन्तर जेवण मग दुपारची वाम कुक्षी म्हणून तणगा लावला की दुपारचे 4 च वाजत मग कपड बदलून च्या घेवून तोंडात तंबाखू चा बार भरला की मग गावातील डाक बटवडा चालु.
एकेक अळी संपवत त्यो वडा च्या झाडा ला फेरी मारीत आमच्या अळीत येणार तेवढ्यात त्याला बंड्या नी धरला थांब की जातुस कुठ वाईच तंबाखू देवून जा तसा बाबा साब उतरला सायकल कमरला लावून हात बंडी च्या खिश्यात घातला व चंची काढून बंड्याला दिली तस हावरट पणाने तंबाखू हातात घेतली व चुना लावून चोळीत दोन बोटांनी बार अलगद तोंडात टाकत म्हणला, ‘ हिक्कड कुठ तसा बाबा साब म्हंला पार्सल आलाय,बंड्या न लगेच ईचारल कुणाचं गा पार्सल , तुला काय करायचं गप्प जा की तुला दिली हाय नव्ह तंबाखु खा अन जा की . तेव्हढ्याव बंड्या गप्प बसणार नव्हता त्याला चांभार चवकशी करायची सवयच हुती. चल मी बी येतो तुझ्या संगट अस म्हणून बंड्या त्याच्या मागच लागला .
तस बाबासाहेबान नामी शक्कल काढली व म्हणाला एक खोत आज्जीची मनिऑर्डर हाय रातच्या आत देऊन याय लागलं . आता खोत आज्जी म्हणजे 2 मैल लांब मळ्यात राहतीय चल तकड च जाऊ अदुगर म्हटल्याव बंड्या न काढता पाय घेतला
तस मग बाबसाब खालच्या आळीत बटवडा देऊन त्यानं
मेनरोड वरच्या मगदुम हाटेल त शिरला . मगदुम अण्णा गिर्हइक बघण्यात मग्न , तस हाटीला त काम करणारा शिरपा न ऑर्डर दिली . आत एक शिरा भैर ( बाहेर ) दोन वडा ! अस हेल काढून झाल्यावर बाबसाब हसाय लागला. तवर मगदुम अण्णांनी पोष्टमन ला बघितल्याव , सिरप्या 2 च्या (चहा ) घेऊन ये . अण्णांनी च्या देऊन पोष्टमन बाबसाब च स्वागत केले, त्याच कारण बी तसच हुत मगदुमना फिल्मी फेअर च साप्ताहिक येत हुत आतल्या गोटातली बातमी म्हणजे , बाबसाब च्या गल्लीत गुजक्का राहत हुती . गुजक्का व मगदुम अण्णा च मेतकूट सगळ्या गावात पब्लिक झाल्या ल .
तस अण्णांनी फिल्मी फेअर घेतलं व हळूच शंभर रुपाई च नोट काढुन बाबासाहेब कड देत म्हटलं , बाबसाब हे नजरेनं च हुं अस म्हंटल तस बाबसाब ला सगळं कळलं
बटवडा सम्पल्या वर मग त्याच धान्य पार्सल कड गेलं त्यावरच पत्ता जरा पावसाच्या सरीत भिजल्यानं पुसट झालं हुत.
तरी बी त्यानं चष्म्याचा काचातुन नीट बघितलं शेवंतां माळी च्या ठिकाणी शेवंतां घाळी झालेल्य हुत, तरीपण त्यांनी कालीज मध्ये शिकणाऱ्या दोन चार पोरांना दाखवलंच . प्रत्येक जण शेवंतां माळी ऐवजी शेवंतां घाळीच म्हणत हुता
आता शेवंतां घाळी म्हणजे मेन रोड वरच गावच्या सेक्रेटरी ची बायको
तिच्या घरी गेला व अक्का तुमचं पार्सल घ्या आलाय अस जोरात हाळी दिली . नेमकं सेक्रेटरी जवळच्या च
गावात गेलं हुत .
सेक्रेटरी सायबानीच पार्सल ऑर्डर केलं असलं म्हणुन ते पार्सल घाळी बाईंनी घेतल व रीतसर पोच पावतीवर अंगठा बी उठवला .
तस सगळं काम संपलं म्हणुन , बाबसाब न तिथंच
तम्बाकु चा बार भरला व येतो अक्का अस म्हणुन सायकलवर टांग टाकली . व घरी निघाला.
प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
अंकली कॉपी राईट