वेंगुर्ले
म्हापण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठीचे मतदान आज शांततामय मार्गाने पार पडले. एकूण २५२४ मतदारापैकी तब्बल १८३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुण ७२.७०% मतदान संपूर्ण गावातून झाले. प्रभाग निहाय विचार करता प्रभाग क्रमांक १ खवणे मध्ये ५४२ पैकी ४२० म्हणजे ७७.४९%, प्रभाग क्रमांक २ मळई मध्ये ६०७ पैकी ४६२ म्हणजे ७६%, प्रभाग क्रमांक ३ म्हापण खालचावाडा मध्ये ५०६ पैकी ३५२ म्हणजे ७९.५६%, व प्रभाग क्रमांक ४ म्हापण मध्ये ८६९ पैकी ६०१ म्हणजे ७९.१५% मतदान पार पडले आहे.
सरपंच पदासाठी तिरंगी लढत म्हापण मध्ये रंगली आहे. कोणता उमेदवार विजयी होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याने आता निकालाची उत्सुकता सर्व म्हापण वासियांना लागलेली आहे.