You are currently viewing ७१९ सरपंच पदाचे उमेदवार व ४६४९ सदस्य पदाच्या उमेदवारारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रात सिलबद्ध होणार!

७१९ सरपंच पदाचे उमेदवार व ४६४९ सदस्य पदाच्या उमेदवारारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रात सिलबद्ध होणार!

ग्रा.प.निवडणूकी प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायत पैकी ३२ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या निवडींसाठी मतदान होत आहे. ९२९ मतदान केंद्रावर २ लाख ४७ हजार १६ पुरुष आणि २ लाख ५२ हजार २० महिला मतदार असे एकूण ४ लाख ९९ हजार ३६ मतदार ७१९ सरपंच उमेदवारातून २९३ सरपंच आणि ४ हजर६४९ उमेदवारातून २५५१ सदस्यांचे भवितव्य ठरवीणार आहेत.
जिल्ह्यात गेले आठ दिवस ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती ,काल रात्री गावागावात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा शिंदे गटाचे कार्यकर्ते कंदील प्रचार करताना दंग होते आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक गावात कंदील प्रचार” रात्रीचा खेळ “सुरूच होता प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क साधून आपल्याला मत मिळावे या दृष्टीने मतपरिवर्तन करण्यात जंगल पछाडताना रात्री उशिरापर्यंत गावागावात पक्ष्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतांसाठी रात्रीचा खेळ सुरू होता काल सायंकाळी जिल्ह्यातील ९२९ मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान यंत्रे कर्मचारी दाखल झाले आहेत ९२९ मतदान केंद्रावर एकूण ३हजार७१७आणि अधिकचे ४०० राखीव कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे,

तसेच राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह सुमारे दीड हजार पोलीस ताफा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस, होमगार्ड देण्यात आला आहे प्रतिष्ठेच्या होणाऱ्या काही ग्रामपंचायती वर ज्यादा पोलीस नेमण्यात आले आहेत मतदान शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला आहे या निवडणुकां ग्रामपातळीवर असल्याने सर्व तहसील स्तरावर नियोजन करण्यात आले होते या निवडणुका पक्ष चिन्हावर नसल्या तरी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा युतीने उद्याच्या जि. प. आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन ग्रामपंचायत केंद्रबिंदू असल्याने सत्ता काबीज करून आपला सरपंच बसावा त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे,
जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ३२५ ग्रामपंचायत पैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. २९३ सरपंच पदासाठी ७९० उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत तर ४६४९ उमेदवारातून २,५५१ सदस्य पदाचे भवितव्य निश्चित होणार आहे, जिल्ह्यातील एकूण ४ लाख ९९३६ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार १६ पुरुष आणि २ लाख ५२ हजार २० महिला मतदार आहेत जिल्ह्यातील ९२९ मतदान केंद्रावर सावंतवाडी तालुक्यातील १५५ मतदान केंद्रात एकूण ६४ हजार ३३५ मतदारांपैकी ३१हजार ६६९ पुरुष आणि ३१ हजार ६६९ वेंगुर्ला तालुक्यात ८१ मतदान केंद्रावर ४६ हजार पंचवीस मतदारात 23 हजार २८७ पुरुष आणि २२ हजार७७८ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत दोडामार्ग तालुक्यात ७४ मतदान केंद्रावर २६,९०७ एकूण मतदानात १३५९० पुरुष आणि १३ हजार ३१७ महिला मतदार आहेत. कुडाळ तालुक्यात १८६ मतदान केंद्रावर ९३ हजार ४२४ मतदारांमध्ये ४७ हजार ६८ पुरुष आणि ४६ हजार ३५६ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, मालवण तालुक्यात एकूण १३९मतदान केंद्रावर ४९,१४५ मतदारांमध्ये २४ हजार ४४ पुरुष आणि २५ हजार १०१ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . कणकवली तालुक्यात १६६ मतदान केंद्रावर एकूण ८३ हजार १०९ मतदारात ४१ हजार १८ पुरुष आणि ४२ हजार ९१ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वैभववाडी तालुक्यात 33 केंद्रावर११ हजार ३७ मतदारांमध्ये ५२७१ पुरुष आणि ५७६६ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत ,देवगड तालुक्यात ९५ मतदान केंद्रावर ३५ हजार ९५४ एकूण मतदारांमध्ये १७८१२ पुरुष आणि १८१४२ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत ,एकूण ९२९ मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात ४ लाख ९९ हजार ३६ एकूण मतदारांमध्ये २ लाख ४६ हजार १६ पुरुष आणि २ लाख ५२ हजार २० महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा