You are currently viewing हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही ; आमदार नितेश राणे

हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही ; आमदार नितेश राणे

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

बिलावल भुट्टो च्या पुतळ्याचे केले दहन

प्रतिनिधी

जो व्यक्ती राष्ट्रावर प्रेम करतो. हिंदुस्तानवर प्रेम करतो तो देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कधीही सहन करणार नाही. खरा हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही अपमान सहन करणार नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो चे कार्टे यांनी जे काही अपशब्द वापरले आहेत ते आम्ही कधीही सहन करणार नाही. असा संदेश पाकिस्तान पर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच बिलावर भुट्टो च्या पुतळ्याचे दहन कणकवलीत आम्ही केलेले आहे.

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही एवढेच नाही.तर महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद किंवा पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर अशा व्यक्तीची जीभ छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा सज्ज इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे दिला आहे.

कणकवली येथे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयासमोर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी पाकिस्तानचे पाकिस्तान ला खडे बोल सुनावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा