सावंतवाडी
सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीला सांगली येथे सर्वोत्कृष्ट ॲकेडमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कै.मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या खुल्या बुदधिबळ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मुक्ताई ॲकेडमीचा सन्मान करण्यात आला.गेली सात वर्षे विदयार्थ्यांसाठी ॲकेडमी विविध क्रिडा प्रकार आणि इतर उपक्रमात कार्यरत आहे.सर्वोत्कृष्ट ॲकेडमीचा पुरस्कार मिळवणारी कोकणातील ही पहिलीच ॲकेडमी आहे.
सांगलीतील स्पर्धेसोबतच बेळगावमधील कै.निंगाप्पा आणि कोल्हापुरमधील कै.श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धांमध्ये
ॲकेडमीच्या जिल्हाभरातील सोळा विदयार्थी, विदयार्थिनींनी सहभाग घेतला.विजेत्या विदयार्थ्यांना रोख पारितोषिके, ट्राॅफी, प्रशस्तीपत्रं देण्यात आली.विजेते राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, भावेश कुडतरकर, यश सावंत, भुमि कामत, गार्गी सावंत यांच्यासह राजेश विरनोडकर, साक्षी रामदुरकर, विधी पाटील, उत्कर्षा परब, प्रतिक देसाई, आयुष राठोड, कुडाळ मधील अर्ष पोटफोडे, अनुज व्हनमाने, वेंगुर्ला येथील साईश केरकर या विदयार्थी,विदयार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेतला.
विशेष कौतुक म्हणजे पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील ॲकेडमीचा विदयार्थी मयुुरेेश परुळेकर याने पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन गटामधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली.प्रत्येक स्पर्धेत सात ते आठ राज्यातील जवळपास 300 ते 350 खेळाडुंचा सहभाग होता.
ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी बुदधिबळ सोबतच कॅरम, टेबल टेनिसच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत.कॅरम खेळाडु साक्षी रामदुरकर, क्षितिजा मुंबरकर, आस्था लोंढे, पर्णवी म्हापसेकर, यशराज गवंडे, भावेश कुडतरकर आणि बुदधिबळ खेळाडुंची शालेय स्पर्धांमध्ये विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ॲकेडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि बुदधिबळ राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे यांचे सर्व विदयार्थ्यांना मार्गदर्शन मिळते.