*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम बालगीत*
*जंगलातील सिनेमा (बालगीत)*
जंगलातले प्राणी
एकाजागी जमले,
सिनेमा काढायच्या
कल्पनेत रमले..।१।
हरीणाने कथा लिहिली
कोल्होबाने गीत,
हत्तीने दिले त्यांना
कर्णमधुर संगीत..।२।
वाघ नायक बोले
नायिका मी घेईल,
जो येईल मध्ये
जीव त्याचा जाईल..।३।
माकड कॉमेडियन
अस्वल सोबतीला,
एवढ्यात कसा
सिंह तिथे आला..।४।
डरकाळी फोडली
गळे झाले कोरडे,
धाय मोकलून
सारे प्राणी रडे..।५।
किती आपली शक्ती
साऱ्यांना कळाले,
जीव मुठीत धरून
सारे प्राणी पळाले..।६।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*