You are currently viewing मोती तलावाच्या कठड्याचे काम २६ तारखेपासून सुरू करणार

मोती तलावाच्या कठड्याचे काम २६ तारखेपासून सुरू करणार

कार्यकारी अभियंत्यांची माहिती; उद्या होणारे स्वाक्षरी आंदोलन रद्द

सावंतवाडी

मोती तलावाच्या कठड्याचे काम २६ तारखेपासून हाती घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या घेण्यात आलेली स्वाक्षरी मोहीम आंदोलन थांबविण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. आचारसंहिता असल्यामुळे काम सुरू करण्यास अडचणीत आहे. मात्र २२ तारखेला वर्क ऑर्डर देण्यात येणार असून ठेकेदाराला तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा