You are currently viewing शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलला राष्ट्रवादीचा पाठिंबा – अनंत पिळणकर

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलला राष्ट्रवादीचा पाठिंबा – अनंत पिळणकर

फोंडाघाट

फोंडाघाट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत परिवर्तन पॅनल चे सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून सौ. प्रतिभा शरद अवसरे व सर्व सदस्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सांगितले.

या दरम्यान एका बैठकीत घेण्यात आलेल्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा शरद अवसरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अबू पटेल, सुरेश टक्के, विजय जामदार, समीर सावंत., राष्ट्रवादी युवक कणकवली विधानसभा मतदारसंघाध्यक्ष देवेंद्र पिळणकर, इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा