सिंधुदुर्गनगरी
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळानी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व जिल्हा स्तरीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यास इच्छुक असतील तर कार्यालयाशी संपर्क करावा. क्रीडा स्पर्धा व क्रीडा साहित्यासाठी इच्छुक युवा मंडळानी नेहरू युवा केंद्राच्या, कार्यालयात अर्ज भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये 5 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. यामध्ये 3 वैयक्तिक स्पर्धा 2 ग्रुप स्पर्धाचे आयोजन करणे आवश्यक आहे. ग्रुप स्पर्धेमध्ये फुटबॉल, कबड्डी, हॉकी, हैंडबॉल, बास्केट बॉल, खो खो, हॉलीबॉल, टग ऑफ वार यापैकी 2 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये अॅथ्लेटीक्स, रेसलिंग, आर्चरी, स्विमिंग, जीमन्यास्टिक, टेबल टेनिस, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, ताक्वनदो, बॉक्सींग, जुदो, बॅडमिंटन इ. यापैकी 3 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. एका स्थानिक क्रीडा प्रकाराचे आयोजन करू शकता.
नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळाना मोफत क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळानी क्रीडा साहित्याचा अर्ज भरून द्यावा. क्रीडा साहित्यासाठी मंडळाचा शिक्का असणे आवश्यक आहे. ज्या मंडळाना मागील 2 वर्षात क्रीडा साहित्य प्राप्त झाले आहे अशा मंडळानी क्रीडा साहित्यासाठी अर्ज करू नये. अधिक माहितीसाठी ०२३६२ – २९५०१२ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क करावा.