You are currently viewing तुळस येथे ०७ जानेवारी ला माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी विविध स्पर्धा

तुळस येथे ०७ जानेवारी ला माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी विविध स्पर्धा

वेंगुर्ला

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने कला-क्रीडा- सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक अशा अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग ९व्या वर्षी ०७ जानेवारी २०२३ रोजी श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे सायंकाळी ६.३० वा शाळांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रतिवर्षीप्रमाणे सर्वोत्कृष्ट सादरीकरणांसाठी मानाचा वेताळ करंडक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

सदर जिल्हास्तरीय माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धामध्ये

*समूहगीत गायन*

*समूहनृत्य*

*जोडीनृत्य*

*लावणी नृत्य*

*प्रश्नमंजुषा*

*दशावतार साभिनय स्पर्धा*

अशा स्पर्धांचा समावेश असून विजेत्या प्रथम तीन क्रमांकास रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र तर सर्वच स्पर्धा प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यालयास वेताळ करंडक २०२३ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.*

तसेच जिल्हास्तरीय प्राथमिक शाळांसाठी(इ.१ली ते ४थी)

*समूहनृत्य स्पर्धा*

आयोजित करण्यात आली असून *सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास रु १०००, ७००, ५००, उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे.* अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ०३ जानेवारी २०२३ पर्यंत प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व गुरुदास तिरोडकर(९४२०७४७२६८)

याच्याशी संपर्क साधावा,तरी जास्तीच जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा