You are currently viewing मळगाव येथे कल्पवृक्ष शेतकरी गटाचा कुटुंब मेळावा संपन्न

मळगाव येथे कल्पवृक्ष शेतकरी गटाचा कुटुंब मेळावा संपन्न

सावंतवाडी

प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख व्हावी व कामातील आपलेपणा वाढावा यासाठी कल्पवृक्ष गटातील सदस्यांनी कुटुंब मेळावा आयोजित केला होता.
2015 पासून आजपर्यंत गटाने श्री पध्दतीने भातशेती, बेबीकॉर्न,मुरघास, गांडूळ खत, शेतकरी अभ्यासदौरा,देशी बी संवर्धन,शालेय मुलांसोबत वृक्षारोपण, दूध संकलन केंद्र, ‘गोकुळ’ चे दूध शीतकरण केंद्र(BMC) असा कार्यविस्तार केला आहे.हे सर्व करत असताना गटाच्या सदस्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे योगदान खूप महत्वाचे होते. यासाठी दि 11 डिसेंबर 2022 रोजी मळगाव येथील भागवत गुरुजी यांच्या दत्तमंदिर प्रांगणात कुटुंब मेळावा आयोजित केला होता.
👉”काळानुसार महिलांनी वेळ काढून नवीन ज्ञान घ्यावे लागेल”,असे सौ. अपर्णा खानोलकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले
👉”तरुण पिढीने शेती सोबत प्रक्रिया उद्योगाकडे वळावे यासाठी डॉ हेडगेवार प्रकल्प मार्गदर्शन व सहकार्य करेल”,असे आवाहन प्रकल्पाचे अध्यक्ष श्री सुनील उकिडवे यांनी केले.
👉”गटाच्या सदस्यांनी दूध वाढीबरोबर गुणवत्ता याविषयी अधिक जागरूकता दाखवावी”, अशी अपेक्षा गटाचे अध्यक्ष श्री संतोष सामंत यांनी व्यक्त केले.
👉शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य मिळण्यासाठी कायदा झाला पाहिजे यासाठी 19 डिसें रोजी दिल्ली येथे भारतीय किसान संघाने किसान गर्जना रॅली आयोजित केली आहे. अशी माहिती जिल्हा मंत्री श्री अभय भिडे यांनी दिली.
👉कोणताही वेगळा हेतू न ठेवता गटातील सदस्यांनी एकत्र येत केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे समारोपीय भाषणात रा. स्व. संघ समरसता गतीविधीचे जिल्हा प्रमुख श्री सुरेश कामत यांनी व्यक्त केले.


👉 *एकत्र कुटुंब राहणारे, पारंपरिक बियाणे संवर्धन करणारे,वैदू म्हणून गावातील लोकांना सेवा देणाऱ्या श्री दाजी राणे,श्री बाळू पेडणेकर, श्री सुरेश हरमलकर,श्री तात्या लाखे,श्रीम रेखाताई पडवळ यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.*
सूत्रसंचालन श्री मिलिंद पंतवालावलकरयांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा