आज रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंतसाहेब यांची भेट बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत,ज्येष्ठ नेते भास्कर राणे, ज्येष्ठ नागरिक गणेश राणे, राजु बागवान यांनी घेतली.यावेळी सिंधुदुर्गात नवीन एमआयडीसी व उद्योग आणण्याबाबत चर्चा केली,तसेच येणाऱ्या 16जानेवारीला रत्नागिरीत मुख्यमंत्री शिंदे येत आहेत,त्यावेळी सिंधुदुर्गातील शिष्टमंडळाला भेट देण्याची विनंती केली.