You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेना शिष्टमंडळाची उद्योग मंत्री उदय सामंत यांना सदिच्छा भेट..

बाळासाहेबांची शिवसेना शिष्टमंडळाची उद्योग मंत्री उदय सामंत यांना सदिच्छा भेट..

सिंधुदुर्गात एमआयडीसीत निर्माण करून उद्योगधंदे व रोजगार निर्मिती करण्याबाबत चर्चा..

 

रत्नागिरी :

 

आज सिंधुदुर्गातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत सिंधुदुर्गात एमआयडीसी निर्माण करून उद्योगधंदे आणून रोजगार निर्मिती करावी याबाबत चर्चा केली. तसेच 16 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत आहेत. यावेळी सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना भेटीसाठी वेळ देण्याचीही विनंती करण्यात आली. उद्योगमंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, जेष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे, गणेश राणे, राजू बागवान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा