कणकवली :
शिरवल गावचे ग्रामदैवत श्री. लिंगरवळनाथ देवाचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार १५ डिसेंबर रोजी शिरवल रवळनाथ मंदिर येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री बारा वाजता रवळनाथ मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा, रात्री बारा वाजल्यानंतर चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक दशावतारी प्रयोग सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मानाच्या ओट्या भरल्यानंतर माहेरवाशीणींच्या ओट्या भरण्यात येणार आहेत. या जत्रौत्सवासाठी मुंबईहून चाकरमानी आणि माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणावर येतात. जत्रोत्सवाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि लाभ घ्यावा, असे आवाहन शिरवल वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.