कणकवली :
कणकवली वरवडे गावची ग्रामदेवत श्रीदेव भैरवनाथ मंदिराचा जत्रोत्सव १४ डिसेंबर ला होत असून यंदाच्या वर्षी खास मंदिराला सुशोभीकरण केले आहे. तसेच या मंदिरासाठी संतोष चव्हाण यांच्यावतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केली आहे. या जत्रोत्सवानिमित्त दिवसभरात भक्त भाविकांना दर्शन, भेटीचे नारळ देने, देवीच्या ओट्या भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम होतील.
रात्री देवतेची तरंगकाठी सह पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर दशावतारी नाटक होणार आहे. तरी या जत्रोत्सवास सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मानकरी ग्रामस्थ यांनी केले आहे.
वरवडे हे गाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. त्यांच्या माध्यमातून या गावातील मंदिरे शाळा महाविद्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र हे देखील विकसित करण्यात आले आहेत.