You are currently viewing मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव येथे १६ डिसेंबर रोजी बालआनंद मेळावा

मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव येथे १६ डिसेंबर रोजी बालआनंद मेळावा

मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहारचे आयोजन

सावंतवाडी

मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहार, मळगावच्या आजी-माजी बालक-पालक यांचा ‘बालआनंद मेळावा’ शुक्रवार १६ डिसेंबर रोजी मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या चिंतन हेमंत, शैलजा परव सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव राजाराम राऊळ हे असून मळगाव ऐक्यवर्धक संघ,मुंबईचे संस्था संचालक सीताराम नाईक, संस्था संचालक मोहन मुळीक, संस्था प्रतिनिधी बाबली तेली,शाळा समिती चेअरमन, मनोहर राऊळ आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आस्वाद घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावचे मुख्याध्यापक एम. बी. फाले व रेनबो शिशुविहार मळगावच्या शिक्षिका गौरी डिचोलकर, श्रुती लातये यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा