You are currently viewing गरजू व्यक्तींपर्यंत सेवा रूपाने पोहोचण्याचे काम करतेय सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान

गरजू व्यक्तींपर्यंत सेवा रूपाने पोहोचण्याचे काम करतेय सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान

लाखे वस्ती येथे पार पडले आरोग्य शिबीर

सावंतवाडी

समाजाच्या गरजू घटकांपर्यंत सेवारूपाने पोहोचण्याचे कार्य सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून करीत आहे. शैक्षणिक, जनजागरण, रुग्णसेवा केंद्र याशिवाय आरोग्यविषयक उपक्रम प्रतिष्ठान नेहमीच राबवत असते. प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात नेहमी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असते. परंतु शहरातील गरजूंना देखील या सुविधांची तितकीच आवश्यकता असते. याच उद्देशाने सिंधुमित्र प्रतिष्ठानने सावंतवाडी, जिमखाना मैदानाजवळील लाखे वस्ती येथे “निःशुल्क आरोग्य शिबिर” आयोजित करण्यात आले. श्री रासाई युवक कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन लाखे वस्ती येथील जेष्ठ नागरिक श्रीमती नखाबाई खोरागडे यांचे हस्ते करण्यात आले.

या शिबिरास शल्यतज्ज्ञ डॉ शंकर सावंत, बालरोगतज्ञ डॉ दत्तात्रय सावंत व डॉ संदिप सावंत, फिजिशियन डॉ नंदादीप चोडणकर व डॉ चेतन परब, नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील व डॉ सौ स्वाती पाटील, जनरल फिजिशियन डॉ राहुल गवाणकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे व डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी रुग्ण तपासणी केली. या शिबिरात वय वर्षे ३५ वरील सर्व लाभार्थ्यांची रक्त शर्करा (ब्लड शुगर) तपासणी करण्यात आली. ज्यांची वाढलेली आढळली, त्यांना पुढील उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आवशयक औषधोपचार देण्यात आले.सर्व रुग्णांना आवश्यक औषधोपचार निःशुल्क देण्यात आले. या शिबिराचा लाभ सुमारे १५० रुग्णांनी घेतला.
या शिबिरात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान चे कार्यकर्ते श्री संतोष नाईक, निलेश माणगांवकर, भार्गवराम शिरोडकर, आनंद मेस्त्री, आसिफ शेख, भगवान रेडकर, सिद्देश मणेरीकर, अँड्र्यू फर्नांडिस, दिपक गावकर, प्रकाश पाटील यांनी पूर्णवेळ सहकार्य केले.
शिबिरस्थळाची संपूर्ण व्यवस्था श्री रासाई मंडळाचे दिपक लाखे, सागर लाखे, कृष्णा लाखे, गणेश पाटील, विकी लाखे, गणेश खोरागडे व इतर स्थानिक युवकांनी चोखपने पार पाडली.

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमात यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थी सेवाभावाशी एकरूप होण्यासाठी सामील होत असतात. यावेळी प्रतीक पाटील, प्रशांत, शुभम पावसकर, पांडुरंग सातार्डेकर, लाजरी नाईक, हर्ष,सानिया सारंग, श्रद्धा पारे, अभिज्ञा सावंत व प्रणय पालकर यांनी शिबीर व्यवस्थेत व प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.
दीपक लाखे व कृष्णा लाखे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करून भविष्यात असे अनेक उपक्रम संयुक्तपणे आयोजित करून लाखे वस्तीच्या लाभासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी देखील यास प्रतिसाद देत तात्काळ होकार दिला. जनसामान्य व लाभार्थ्यांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त करून सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या लाखे वस्तीत होणाऱ्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा