You are currently viewing सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेले ते तीन पोल तात्काळ बदला 

सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेले ते तीन पोल तात्काळ बदला 

सामाजिक बांधिलकी तर्फे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर

सावंतवाडी

शहरात तीन ठिकाणी विद्युत पोल पूर्णतः जीर्ण झाले आहेत. संबंधित तिन्ही पोल रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे ते कोसळल्यास अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते पोल तात्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या वतीने वीज वितरणचे उपअभियंता संदीप भुरे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक समताच संबंधित पोल बदलण्याचे काम आम्ही हाती घेऊ, असे आश्वासन श्री. भुरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.

याबाबत आज सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव व सुनील आंबेडकर यांनी श्री. भुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी शहरात तीन ठिकाणी विद्युत पोल जीर्ण झाले आहेत. संबंधित तीनही पोलावर विद्युत तारांचा मोठा भार आहे. त्यामुळे वादळी परिस्थिती ते कोसळून अपघात घडू शकतो. यातील एक पोल हा संचयनी पॅलेस परिसरात आहे. दुसरा गांधी चौकात तर तिसरा गरड परिसरात आहे. या तीनही ठिकाणी मोठी रहदारी असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास जीवितहानी सुद्धा घडू शकते. त्यामुळे ते पोल तात्काळ बदलण्यासंदर्भात कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या वतीने श्री. जाधव यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक संपताच संबंधित पोल बदलण्याचे काम हाती घेऊ, असे आश्वासन श्री. भुरे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा