You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन (मॅन्यूअल) पध्दतीने अर्ज मागविणेत येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  संतोष चिकणे यांनी दिली आहे.

        योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढालीप्रमाणे आहेत. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा, विद्यार्थी जिल्हा ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी परिसरातील असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास टक्यापेक्षा जास्त गुण असावेत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा 40 टक्के इतकी राहील. जिल्ह्यानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना लाभ द्यावयाचा आहे. ही संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे जास्त संख्येने अर्ज सादर झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.

            या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला भोजन भत्ता रु. 25 हजार, निवास भत्ता रु. 12 हजार व निर्वाह भत्ता रु. 6 हजार असे एकूण रु. 43 हजार इतकी रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. गरजू विद्यार्थ्यांनी योजनेचे अर्ज भरुन व अर्जासोबत दिलेल्या सूचीमधील आवश्यक कागदपत्रांसह दि.31 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय आणि महाविद्यालय शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये समक्ष टपालव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

            योजनेबाबतची माहिती व अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दि. 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयात या योजनेविषयीच्या अटी व शर्तीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या योजनेचा अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयात सिधुदुर्गनगरी तसेच महाविद्यालयांच्या नजीकच्या शासकीय वसतिगृहात विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री. चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा