You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” उपक्रमाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित जुन्या जाणत्या सावंतवाडीकरानी आपल्या हृदयात कोरलेल्या सावंतवाडीच्या आठवणींना उजाळा दिला अन सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवल्या. कॉलेजकडील तोफखाना, मोती तलावातील क्रिकेट सामन्यापासून ते अगदी काकू पड्यांत्यांपर्यंतच्या आठवणींचा जागर आठवणीत साठवून ठेवत व्यक्तही झाले आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. जगप्रसिद्ध सावंतवाडी आज बदलत चालली आहे जुनी पूर्वीची सावंतवाडी पुढील पिढीला समजावी या उद्देशाने जुन्या जाणत्या व्यक्तींनी वास्तव स्वरूपात अनुभवलेली सावंतवाडीच्या आठवणी संग्रहित करून ठेवण्यात येणार आहेत असा निर्णय यावेळी घेण्यात आला असा नाविन्यपूर्ण अनोखा उपक्रम साहित्य चळवळीच्या माध्यमातून कोमसाप सावंतवाडी शाखेने राबवला जुनी सावंतवाडी पुन्हा एकदा उभी करण्याचा प्रयत्न केला. एक खरोखरच कौतुकास्पद आहे यातून पूर्वीची सावंतवाडी गेली कुठे त्या आठवणींना उजाळा देत पूर्वीची सावंतवाडी पुन्हा एकदा उभी केली अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीत साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम केले जात आहे आणि त्यात असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सावंतवाडीकरांना एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे वाखाण्याजोग आहे, असे ते म्हणाले.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” या उपक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं करण्यात आली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी कोमसापचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी सावंतवाडीच्या आठवणी कथन करत असताना आठवणी जागवा, व्यक्त व्हा या उपक्रमा मागचा उद्देश विशद केला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम कोमसापन‌ं राबविण्यात आला असून असंख्य वक्त्यांनी व्यक्त होण्याची, आठवणी जागृत करण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, वेळेअभावी सर्वांनाच बोलता आलं नाही. परंतु, आपल्या आठवणी लिखीत स्वरुपात आमच्याकडे द्याव्यात, त्या आठवणींचा संग्रह केला जाईल असे मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले. यानंतर मनोगत व्यक्त करत असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आठवणीतील सावंतवाडी उपस्थितांसमोर उभी केली. शहरातील वास्तुंच्या आठवणी सांगत असतानाच मोती तलावात रंगलेल्या क्रिकेट सामन्याला देखील त्यांनी उजाळा दिला. तर या उपक्रमात व्यक्त केलेल्या आठवणींचा लिखित स्वरूपात संग्रह करून पुस्तिका तयार करण्याचा मानस श्री.साळगावकर यांनी व्यक्त केला. तर ८५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक अनिल परुळेकर यांनी त्यावेळच शिक्षण, आताची आरपीडी म्हणजे दगडी शाळा, कॉलेज, पंचम खेमराज पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांनी ब्रिटीशांच्या विरोधात जावून स्थापन केलेल्या पाच शाळांसह कॉलेजच्या स्थापनेनंतर इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्यानं स्वतः बापुसाहेब महाराजांनी वर्गावर जात इंग्रजीच्या दिलेल्या धड्यांसह ८५ वर्षांत सावंतवाडीशी जोडल्या गेलेल्या जुन्या आठवणी जागृत केल्या. याबरोबरच सहसचिव राजू तावडे यांनी सुरुवातीला पूर्वीच्या जुन्या सावंतवाडीतील काही महत्त्वाचे स्थळांची माहिती करून दिली तुम्ही सावंतवाडी आठवणीतून उभी केली रविंद्र ओगले, अरूण वझे, अँड. अरूण पणदूरकर, अँड. नकुल पार्सेकर, शंकर प्रभू, मेघना राऊळ, चंद्रकांत घाटे, रामदास पारकर, डॉ. जी.ए. बुवा, प्रा. गिरीधर परांजपे, भरत गावडे आदीनी मनोगत व्यक्त करताना हृदयातील सावंतवाडीच्या आठवणी जागवत त्यांना उजाळा दिला.


सावंतवाडी शहर, शहराची रचना, राजघराण, मोती तलाव, एसटीची फेरी, खाद्यपदार्थांची दुकान, शाळा-कॉलेज, प्रा. डॉ. वसंत सावंत, प्रा. श्री. सातवळेकर, प्रा. श्री कळसुलकर, प्रा. सुभाष गोवेकर आदींसोबतचे अनमोल क्षण जागे केले. तर कॉलेजकडील तोफे पासून ते अगदी काकू पडतेपर्यंतच्या आठवणींचा जागर यावेळी करण्यात आला. थेट मुंबईतून सुहास नानीवडेकर यांनी लिखित स्वरूपात या उपक्रमात सहभाग घेतला. जुनी सावंतवाडी कशी होती हे ऐकण्यासाठी युवकांची देखील उपस्थित होती. व्यक्त झालेल्या वक्त्यांचा कोमसापच्या माध्यमातून व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक अनिल परुळेकर, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, प्रा. रूपेश पाटील, वाय.पी.नाईक, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोंसले, दीपक पटेकर, दादा मडकईकर, दत्तप्रसाद गोठस्कर, रवी जाधव, सुरेश मुकन्नावार, दिनानाथ सावंत, मंगेश राऊळ, रितेश राऊळ, नितीन वराडकर, हरी भाट, प्रकाश मसुरकर, रमाकांत गावडे, श्रद्धा सावंत, भरत सराफदार, संदीप शेर्लेकर, विजय टोपले, सोहम सातावळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तावडे, सूत्रसंचालन विनायक गांवस तर आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा