वैभववाडी
अतिशय प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय सैन्य विमान वाहतूक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मेजर प्राजक्ता देसाई -रावराणे यांना अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.पुणे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा समारंभ पार पडला.
मेजर प्राजक्ता देसाई-रावराणे ह्या वैभववाडी तालुक्यातील लोरे.नं.२ गावच्या असून सध्या सैन्य दलात देशाची सेवा करीत असलेले मेजर सिद्धेश अरुण रावराणे यांच्या पत्नी आहेत.मेजर प्राजक्ता यांचे माहेर संगमेश्वर तालुक्यातील मांजरे गाव आहे.त्यांचे शिक्षण हे मुंबईत झाले.
असामान्य कारकीर्द पार पाडण्यासाठी त्यांनी ध्येय पार पाडले.त्यांच्या धाडसी कामगिरी बद्दल केंद्र शासन पुरस्कृत सन २०२१–२०२२ या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर (धर्मपीठचा) राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मानला जातो.हा कार्यक्रम आचार्य अत्रे रंग मंदिर,पिंपरी चिंचवड, पुणे येथे पार पडला.
मेजर प्राजक्ता देसाई- रावराणे यांनी गेली ११ वर्षे हवाई दलात काम केले असून मानव रहित हवाई वाहन निरीक्षण पायलट म्हणून पात्र ठरणारी भारतीय लष्करातील पहिली महिला अधिकारी आहेत.त्यांनी आपल्या देशाच्या उत्तर , ईशान्य,पश्चिम क्षेत्रासारख्या विविध भागामध्ये महत्व कामगिरी बजाविली आहे.
त्यांनी काश्मीर,सिक्कीम, सिलिगुडी करिडॉर आणि पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवरील अतिशय धोकादायक भागात काम केले आहे.पठाण कोट दहतशत वादी हल्ला,संजूवानं आर्मी कॅम्,दिनांनगर पोलीस स्टेशन हल्ला,बालकोट एअर स्ट्राईक, च्या वेळी मेजर प्राजक्ता यांनी महत्व पूर्ण कामगिरी बजावून हवाई सरक्षण तोफा तैनात करण्यास समर्थम केले.
मेजर प्राजक्ता ह्या आता निवृत्त होऊन अमॅझॉन या नामवंत कंपनीत व्यवस्थापक पदी रुजू झाल्या आहेत.संरक्षण दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करणे,महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास सत्रे विनामुल्य घेणे,मोफत वैद्यकीय सेवेसह भटक्या प्राण्यांना निवारा उभारणे अशी समाजपोयोगी कामे त्या करीत आहेत.