You are currently viewing सावंतवाडीत ॲक्रेडिया सुपर मार्केटचे मोठ्या उत्साहात उद्घाटन….

सावंतवाडीत ॲक्रेडिया सुपर मार्केटचे मोठ्या उत्साहात उद्घाटन….

पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद; ग्राहकांना पुन्हा एकदा दर्जेदार सेवा देणार, शैलेंद्र पेडणेकर….

सावंतवाडी

“ई स्टोअर”शी करार करून ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा नव्या दमात सुरू करण्यात आलेल्या “ॲक्रेडिया” सुपर मार्केटचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी गोवा-महाराष्ट्रचे प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर यांच्याहस्ते हा शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला, हे पाहून आम्ही ग्राहकांना अपेक्षित असलेली सेवा देण्यास बंधनकारक राहून परतावा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन श्री. पेडणेकर यांनी दिली. येथील वैश्यवाडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ॲक्रेडिया सुपरमार्केटचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी रवींद्रनाथ मंडल, स्वप्निल गावडे, विजय कुडव, रोनक पटेल, किरण कदम, देविदास परब, संजय पवार, सुमित राणे, संदीप आरोंदेकर, राजन पताडे, महेश कल्याणकर तसेच संस्थेचे पदाधिकारी, शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + ten =