You are currently viewing सांजवेळ

सांजवेळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ज्येष्ठ लेखक कवी माधव वि. सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सांजवेळ*
**********

बरेच काही माझे पण मालकी कुठेच नाही
जीव जरी माझा तरी त्यावर सत्ता माझी नाही

सारे आपुले म्हणुनी नाती हॄदयी जपत राहिलो
मृगजळ होते सारे आपुले कुणीच भासत नाही

प्रारब्ध भाळीचे अगदी सहजी भोगुनी झाले
आता भोगण्यासारखे तर काहीच उरले नाही

जगताना रोज रोज पाहतो हसरे बेगडी चेहरे
पण निर्मळ प्रसन्न खरा चेहरा कुठेच दिसत नाही

आज या युगी निर्विकार , शुष्क स्पर्श भावनांचे
विकल स्पंदने उध्वस्त भावनां दूजे जीवन नाही

सांजवेळी आता ही गात्रे सारीच कुरकुरती
तोच अनामिक तारणारा दूसरे कोणी नाही
***********************************
*रचना क्र. ३२५/८/१२/ २०२२*
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा