*स्नेहल प्रकाशन परिवार समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ. प्रवीण उर्फ जी आर जोशी लिखित अप्रतिम लेख*
*स्थितप्रज्ञ*
*(शरीर शारीरी भाग 4 )*
आयुष्याच्या हा महासागर अथांग आहे . जन्म ते मृत्यू असा हा व्यापक कालखंड ! जन्म व मृत्यू ह्या दोन्ही घटना आपण स्वतः पाहू शकत नाहीच ! केवढं दुर्दैव आहे ! जन्मतः अनभिज्ञ व मृत्यू होत असताना ही अनभिज्ञ ! ह्या दोन्ही घटना मधील अंतर म्हणजे आयुष्य ! कस ,कुठे , कोणा बरोबर, जगायचं हे विधी लिखित !
अस सगळं असताना ही , अनेक घटनांचे
क्षणाचे साक्षीदार ! वर्तमान जगत असताना भूतकाळ होतो ! भविष्य अंधारात चाचपडत ! त्रिकाळ ज्ञान असणारे काही अवलिया ह्या भूतलावर अस्तित्वात होते , आहेत ! त्यांनाच तर आपण संत , महंत म्हणतो !
त्यांना ह्या जगातील जड व्यवहाराशी काही देणे घेणे नसतेच मुळी ! जगात असून नसल्या सारखे का राहतात ! तर ते मार्गदर्शक असतात ! सुखदुःख कष्ट क्लेश , ह्याचा पलीकडे जाऊन त्यांची दृष्टी ही पारलौकिक झालेली असते !
कमलपत्र पाण्यात राहूनही पाणी अंगाला लावून घेत नाही , तरीपण ते त्या गुल्मशी एकरूप असते! त्याच्याशी प्रातारणा करत नाही ! अश्या जीवांना च
” स्थितप्रज्ञ ” अशी संज्ञा
आहे . जीवनात असे अनेक बैरागी, साधू संत , यांचे दर्शन होत असतेच . त्यांची प्रज्ञा उच्च कोटीला पोहचली असल्याने, ते षड्रिपु रहित असतात . योग साधनेने त्यांची अष्टचक्रे कुंडलिनी जागृत झालेली असतात !
फक्त मनुष्यत्व प्राप्त झाल्याने , जनकल्याणस्तव
झटतात .
काहीं प्रपंचात राहूनही परमार्थ साध्य करणारे दिव्य विभूती पाहण्यासाठी मिळतात ! पण ते स्थितप्रज्ञ राहूनच ! याचाच अर्थ त्यांनी मन व बुद्धीवर ताबा मिळवून
आत्म्याच्या उन्मनी अवस्थेत आपले व्यवहार करतात !
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट