You are currently viewing मालवण तालुक्यात दहा सरपंच बिनविरोध

मालवण तालुक्यात दहा सरपंच बिनविरोध

१८ प्रभागही बिनविरोध : ४५ सरपंचपद, १४८ प्रभागांसाठी निवडणूक

मालवण

मालवण तालुक्यातील नऊ ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर एका ठिकाणी उमेदवारी अर्जच दाखल करण्यात आलेला नाही. तालुक्यात सात ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. १६६ पैकी १८ प्रभाग बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे ५४ सदस्य बिनविरोध झाले आहेत. आता ४५ सरपंच पदांसाठी व १४८ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मालवण तालुक्यात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.यात प्रामुख्याने असगणी (साक्षी नामदेव चव्हाण), पळसंब (महेश बापू वरक), शिरवंडे (चैताली चंद्रकांत गावकर), साळेल (रवींद्र सहदेव साळकर), आंबडोस (सुबोधिनी राजेश परब), काळसे (विशाखा विजय काळसेकर), घुमडे ( स्नेहल श्रीकृष्ण बिरमोळे), कातवड ( प्रतिक्षा ऋषिकेश हळदणकर), आनंदव्हाळ – कलचाव्हाळ(रेश्मी राजेंद्र टेंबुलकर) हे नऊ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर बांदिवडे खुर्द (कोईल) येथे सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे या दहा ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक आता होणार नाही. उर्वरित ४५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.

 

बिनविरोध प्रभाग

 

बिनविरोध प्रभागांमध्ये मठ बुद्रुक, असगणी, हिवाळे, तोंडवळी, रेवंडी, मालोंड, चाफेखोल, खोटले, वराड, आंबेरी, आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ, तारकर्ली या गावातील काही वॉर्डींचा समावेश आहे. असगणी आणि आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ गावात सरपंच पद बिनविरोध झालेले असून सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे.

 

वराडमध्ये तब्बल तीन प्रभाग बिनविरोध झाले आहेत. खोटले गावातही तीन प्रभाग बिनविरोध होऊन सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. आंबेरी आणि असगणीमध्ये दोन प्रभाग बिनविरोध झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा