You are currently viewing सागरी हवामानाच्या माहितीमुळे जीवाचे होते संरक्षण – तुषार अरविंद मर्दे

सागरी हवामानाच्या माहितीमुळे जीवाचे होते संरक्षण – तुषार अरविंद मर्दे

रत्नागिरी

बाहेरून शांत भासणारा समुद्र कधी कधी अत्यंत रौद्र रूप धारण करतो.उदरनिर्वाहाच साधन म्हणून मासेमारी करणारे मासेमार बांधव सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात . लहान बोट व कमी मनुष्यबळ आणि आधुनिक संवादाच्या साधनाची कमतरता , अशी यंत्रणा नसल्याने हे मासेमार सर्रास सागरी अपघातांना बळी पडतात.
डहाणू पालघर येथे राहणारे 42 वर्षीय तुषार अरविंद मर्दे यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मासेमारी हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आहेत. तुषार यांची स्वतची लहान फायबर ची होडी आहे व त्यावर 7 माचिमार कामाला आहेत . तुषार अरविंद मर्दे एक पारंपरिक मासेमार असून गेली 13 वर्ष मासेमारी करत आहेत . 2020 साली रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांशी काही कामानिमित्त तुषार यांची भेट झाली. त्यांनी स्वतः रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामानाच्या व्हाट्सप सेवेला जोडले गेले.


तुषार अरविंद मर्दे रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामान सेवेसोबत २ वर्षापूर्वी जोडले गेले. रिलायन्स फाऊंडेशन कडून माहिती मिळवायला सुरवात केल्यावर या महितीचा आणि प्रत्यक्ष समुद्रातील परिस्थितीचा ताळमेळ लावून ही सेवेचा उपयोग करायला सुरवात केली .
रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी हवामानाची माहिती व हवामानाची माहिती मिळवण्यापूर्वीचा मासेमारी व्यवसाय यातला फरक सांगताना तुषार म्हणतात, “ रिलायन्स फाउंडेशन यांनी आम्हाला सागरी हवामानाची माहिती देण्यास सुरू केली, परंतु अशी माहिती आम्हाला यापूर्वी कोठेही मिळत न्हवती. काही वेळेस व्हाटसप्प वर आम्हाला चुकीचे वादळाचे मेसेज यायचे त्यामुळे गैरसमज व भीती निर्माण व्हायची . परंतु आता रिलायन्स फाऊंडेशनकडून माहिती मिळायला लागल्यापासून आम्ही एक दिवस आधीच समुद्रामध्ये जायचं की नाही याचा निर्णय घेऊ लागलो.संभाव्य धोके टाळणे शक्य झाले. ज्या मासेमार्‍याना इंटरनेट किंवा मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येत नाही अश्यांसाठी तंत्रद्यानाच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी माहिती उपयुक्त ठरत आहे.

रिलायन्स फाऊंडेशनकडून वार्‍याचा वेग जास्त आहे किंवा हवामानाची परिस्थिति कधीही बदलू शकते अशी माहिती मिळते तेव्हा आम्ही मासेमारीसाठी जात नाही त्यामुळे आमचा वेळ,श्रम आणि जीवन तसेच अत्यंत महत्त्वाचे इंधन बचत होते. वार्‍याचा वेग अचानक बदलला तर बोट अर्ध्या मार्गातून परत घ्यावी लागते त्यामुळे डीझेलच नुकसान होत. एप्रिल 2022 ते नोवेंबर 2022 या 8 महिन्याचं विचार करता अंदाजे 10-12 वेळेस वादळाची शक्यता किवा उंच लाटा उटणार आहेत अशी सूचना मिळाली होती . अशा वेळेस आम्ही 5 वेळेस बोट समुद्रामध्ये मासेमारीसाठी नाही पाठवली त्यामुळे साधारणतः 45 000 ची बचत करता आली. एका फेरीस साधारणतः 5000 रुपयांचे डिसेल लागते , तसेच 2500-3000 रुपये बोटीवरील माछिमार यांना द्यावे लागतात व साधारणतः 2000 रुपये बर्फ प्रती दिवशी लागतो . रिलायन्स फाऊंडेशन व INCOIS यांचे आभार मानून ही सेवा अशीच अविरत चालू ठेवावी,अशी विनंती तुषार अरविंद मर्दे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा