You are currently viewing मुक्त सैनिक हौसिंग सोसायटीवर प्रशासक नेमणुकीसाठी निदर्शने

मुक्त सैनिक हौसिंग सोसायटीवर प्रशासक नेमणुकीसाठी निदर्शने

मुक्त सैनिक हौसिंग सोसायटीवर प्रशासक नेमणुकीसाठी निदर्शने

इचलकरंजी : प्रतिनिधी

मुक्त सैनिक हौसिंग सोसायटीवर प्रशासक नेमावा तसेच सोसायटीची सभासद यादी व नियमबाह्य हस्तांतरण हरकती व आदर्श शिक्षण मंडळास दिलेल्या खुल्या जागेची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी सोसायटीच्या सभासदांच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.तसेच सदर मागणीचे निवेदन
प्रांताधिकारी डॉ.विकास खरात व हातकणंगले येथे सहकारी संस्था उपनिबंधकांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की , इचलकरंजी शहरातील मुक्त सैनिक हौसिंग
सोसायटीचा मागील आर्थिक वर्षातील
नफा तोटा बोगस दाखवण्यात आला आहे. सभासद व वारसांना चुकीच्या नोटीसा काढून अपात्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
एक लाख एक हजार रुपये उत्पनात जमा व संचालक मंडळ भत्ता अफरातफर केली आहे.तसेच
एक लाख सत्तर हजार रुपये वकील फी दाखवून सभासदांच्या नावे नियमबाह्य दाखवून जमा खर्च केला आहे. सोसायटीचे सचिव रामचंद्र डावरे यांनी सोसायटीचे मोठ्या प्रमाणात सोसायटीचे नुकसान केले आहे , असे निदर्शनात येत आहे. सोसायटीचे चेअरमन संभाजी खोचरे यांनी सोसायटीमध्ये नियमबाह्य कारभार व सोसायटीच्या नुकसानीस चेअरमन या नात्याने तेच जबाबदार आहेत. सोसायटीच्या ओपन प्लॉटवर आदर्श शिक्षण संस्थने नियमबाह्य कब्जा केला आहे त्याची चौकशी व्हावी. हौसिंग सोसायटी व औदयोगिक संघाचा कालावधी संपला असून त्यावर प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात यावी. सोसायटीकडील प्लॉट बापूसो खामकर, निनाद खामकर व सुबोध खामकर या एकाच कुटूंबाकडे देण्यात आले आहेत.
संस्थेचे चेअरमन संभाजी खोचरे यांनीही स्वतःचा प्लॉट अनाधिकृत घेतलेला आहे.संस्थेचे सचिव रामचंद्र डावरे व चेअरमन संभाजी खोचरे यांचे नातेवाईक यांच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने प्लॉट हस्तांतर केला आहे.
औदयोगिक इमारत नंबर १,२,३ यामध्ये रिपेअरीसाठी ७ लाख रुपये खर्च दाखवून चेअरमन संभाजी खोचरे व सचिव रामचंद्र डावरे यांनी फसवणूक केली आहे ,असे निदर्शनात येते.त्यामुळे मुक्त सैनिक हौसिंग सोसायटीवर प्रशासक नेमावा तसेच सोसायटीची सभासद यादी व नियमबाह्य हस्तांतरण हरकती व आदर्श शिक्षण मंडळास दिलेल्या खुल्या जागेची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी सोसायटीच्या सभासदांच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.तसेच सदर मागणीचे निवेदन
प्रांताधिकारी डॉ.विकास खरात व हातकणंगले येथे सहकारी संस्था उपनिबंधकांना देण्यात आले.

या निदर्शनात सोसायटीचे सभासद श्रीकांत सांगावकर , दयानंद तासगांवे , प्रमोद जाधव ,प्रितम आलुगडे , मुकुंद शेंडगे , रोहित पाटील ,सौ.विद्या खामकर , विनायक खामकर , रघुनाथ टेके ,प्रशांत अणूरकर , शिवाजी आमणे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा