You are currently viewing आम.नाईक यांचा भुमिपूजन कार्यक्रम म्हणजे ‘गोलमाल’

आम.नाईक यांचा भुमिपूजन कार्यक्रम म्हणजे ‘गोलमाल’

धुपप्रतिबंधक बंधारासाठी सीआरझेड क्लिअरन्स नसताना भुमिपूजन करणे ही जनतेची फसवणुक -अमित इब्रामपूरकर

मालवण

सहा महिन्यांच्या आत काम होणार, पूर्ण होणार अशी वलग्ना करत आम.वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या साडे चार कोटीच्या कामाचे भूमिपूजन केले पण आता सात महिने झाले काम अपूर्णच असुन लागणारा एम. सी. झेड. एम.ए.चा नाहरकत दाखला सुद्धा मिळालेला नाही.शिवराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही गेली तीन वर्ष अपूर्ण आहे यावरून आमदार जनतेला फसवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

अमित इब्रामपूरकर यांनी पुढे म्हटले आहे कि आम. नाईक यांनी मे २२ ला भूमिपूजन केले.धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची जागा २०११ च्या परिपत्रक आणि मंजुर नकाशाप्रमाणे सीआरझेड ३ मध्ये आहे.शासकीय कामांना अंतिम मंजुरीसाठी एम.सी.झेड.एम.ए.चा नाहरकत दाखला शासनाच्या पर्यावरण विभागाकडून घ्यावा लागतो.त्यावेळी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते.पण जिल्यातील सेनेच्या आमदारांची कामे झाली नाहीत.सदर कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर एम.सी. झेड. एम. ए ( महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण) च्या आतापर्यंत १५ बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीमध्ये राज्यातील सीआरझेड संदर्भातील सुमारे तीस ते पस्तीस प्रकरणे असतात. या झालेल्या बैठकांमध्ये रायगड आणि मुंबईच्या प्रकल्पाना प्राधान्य दिले गेले. आमदार नाईकाना मुंबईत कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागत आहेत म्हणजेच राजकीय अनास्था असल्याने आणि आमदार नाईक यांना प्रकल्पांसाठी कोणत्या आणि कुठे परवानग्या घ्याव्या लागतात माहित नसल्याने सुरु असलेली कामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.त्याचा भविष्यात जनतेला त्रास होणार आहे._

शिवसेना पक्षाची नेते मंडळी आणि आमदार नाईक ज्या शिवछत्रपतींच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे.त्या किल्ल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मंदिराच्या डागडुजीचे काम गेली तीन वर्षे म्हणजेच कोरोना काळाच्या अगोदर पासून सुरू आहे. या मंदिराच्या चाललेल्या कामावर स्थानिक आमदारांचा लक्ष असणे आवश्यक होते.काम अपूर्ण असल्याने संबधितांना जाब विचाराने आवश्यक होते. परंतु शिव-जयंती उत्सवाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पुष्पहार अर्पण करून फोटो काढणे यापलीकडे आमदार वैभव नाईक यांनी काहीच केले नाही.त्यामुळे आमदार वैभव नाईकांची बनवेगिरी वेळीच जनतेने ओळखावी असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा