*सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा…*
*कोमसापचा अनोखा उपक्रम ११ डिसेंबर रोजी सायं. ६.०० वा. सेल्फी पॉइंटवर*
सावंतवाडी प्रतिनिधी संस्थानकालीन सावंतवाडी शहर या शहराचा इतिहास जगप्रसिद्ध आहे या शहराला एक वेगळे महत्त्व आहे प्रसिद्ध लाकडी खेळणी गंजिफा संस्थानकालीन मोती तलाव संस्थानकालीन राजवाडा अध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक साहित्यिक अशा विविध अंगाने हे शहर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे या सावंतवाडी सुंदरवाडी शहराच्या जुन्या आठवणी जागवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने एक अनोखा असा उपक्रम सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा यासाठी जुने जाणते सावंतवाडी करा ना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हा कार्यक्रम रविवारी 11 डिसेंबर रोजी सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलाव परिसरातील सेल्फी पॉइंट येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे या उपक्रमासाठी व सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी शहराचा परिचय जुने व्यक्ती विशद करणार आहेत त्यासाठी अनेकांनी नावे दिली आहेत इतिहासावर प्रा जी ए बुवा सुधीर धुमे रवींद्र ओगले शंकर प्रभू अरुण वझे अनिल परुळेकर एडवोकेट अरुण पण दूरकर श्री घाटे प्रकाश बांदेकर आधी जवळपास 25 हून अधिक जण ह्या कार्यक्रमात व्यक्त होणार आहेत तसेच कार्यक्रमा वेळीही उपस्थित राहून काही जाणकार व्यक्तींनी आपणही व्यक्त होणार आहोत असे स्पष्ट केले आहे हा कार्यक्रम दहा डिसेंबर रोजी होणार होता परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो 11 डिसेंबर सायंकाळी सहा वाजता मोती तलावाच्या काठी आयोजित करण्यात आला आहे तरी ज्या जाणकार व्यक्तींना अजूनही आपली नावे नोंदवायचे असतील फक्त पाच मिनिटे व्यक्त व्हायचे आहे सदर जानकर व्यक्ती सावंतवाडी शहराच्या आठवणी जागवणार आहेत त्या संकलित केल्या जाणार आहेत व त्यांचा सन्मानही केला जाणार आहे त्यामुळे ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे सहसचिव राजू तावडे 94 22 58 4407 व सचिव प्रतिभा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत या कार्यक्रमाला सावंतवाडी करा आणि मोठ्या संख्येने तसेच आजच्या तरुण पिढीने जुनी सावंतवाडी कशी होती हे शब्दात ऐकण्यासाठी आणि ती जागवण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी असे आवाहन कोमसाप तालुका अध्यक्ष अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदींनी केले आहे