You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष हितासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची उमेदवारी मागे

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष हितासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची उमेदवारी मागे

भविष्यात अजित नाडकर्णी यांच्यावर आमदार नितेश राणे सोपविणार पक्षाची मोठी जबाबदारी

फोंडाघाट

फोंडाघाट ग्रामपंचायत निवडणूकित प्रभाग क्र 2 व 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अजित नाडकर्णी यांनी आमदार नितेशजी राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी विनंती केल्यामुळे भाजप पक्षासाठी आपली उमेदवारी मागे घेत पक्ष हिताला महत्व दिले.

फोंडाघाट गावाच्या जडणघडणीत नाडकर्णी कुटुंबाचे मोठे योगदान आहे.आणि तुमच्यासारखी माणसं हिच भा.ज.प. पक्षाची शान आहे.असे मत आमदारांनी व्यक्त केले.या सर्व गोष्टीचे भान ठेवुन अजित नाडकर्णी यांनी फाॅर्म मागे घेतला.आता युतीतील शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांच्या पत्नी सरपंच पदासाठी उभ्या आहेत.त्यांना भरघोस मतांनी निवडुन आणण्याचे युतीने ठरविले आहे.

भविष्यात मा.आमदार नितेश राणे पक्षाची मोठी जबाबदारी अजित नाडकर्णी यांच्यावर सोपवणार आहेत. त्यामुळे लोकांची कामे अजित नाडकर्णी हे करतील. फोंडाघाट प्रभाग नंबर २ सर्व ३ ही सिट अजित नाडकर्णी यांच्यामुळे बिनविरोध निवडुन आल्या. त्यासाठी सर्व उमेदवारांचे कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा