You are currently viewing मध्यांतर

मध्यांतर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर गोवा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मध्यांतर*

मध्यांतर असावा लागतो
जीवाच्या विश्रांतीला….
वामकुक्षीनंतर पुनः परत
नव्या जोमाने, नव्या जोशाने
कामाच्या आरंभाला
नव्या ऊर्जेने सुरू करायला काम…..
ताजेतवाने झालेले तन मन
परत लागते कामाला
नव्या उत्साहात सत्वर….
मध्यांतर असतो आयुष्याला
चाळीशी पन्नाशी ओलंडल्यावर….
दूरवरून क्षितिज खुणावत रहाते
मनुजाला…. गडद होत जाणारा
नीशेच्या आगमनात लुप्त
होत जाणारा संधीप्रकाश…..
तिमिरातल्या सांजवेळेला
आयुच्या अंतीम टप्प्यात
पोहचलेल्या जीवनाला…..
वाकुल्या दाखवत रहातो
पल्याड किनारा मनुष्याला……!
थांबव आता आशा लालसेचे पाश
मनावर, तनावर वेढलेले….
मुक्त… निर्मोही हो आता…..
इहलोकीची यात्रा तुझी आता
पोहचतेय…. शेवटच्या स्टेशनवर
हे मनुजा आता सज्ज रहा
उतरायला….. चीर विश्रांती घ्यायला
मध्यांतर आयुष्याचा आता होत आलाय……
अंतीम स्टेशन समीप येत आहे
मध्यांतर………..!!

मानसी जामसंडेकर
गोवा

प्रतिक्रिया व्यक्त करा