कणकवली
कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, कलातपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते,त्यांच्या कलासहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे.
दरम्यान त्यांची सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, कै.उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी शिक्षकांना मिळावी यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे, याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून स्मृतीशेष सौ.उमा काणेकर यांना वैशिष्टयपूर्ण उपक्रमांतून आदरांजली वाहण्यातयेत आहे.
यावर्षी, कै.उमा महेश काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ खालील स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धा- गट पहिला- ५वी ते ७वी विषय- १) पर्यावरण रक्षण आणि माझी भूमिका २)स्वच्छता अभियानात माझी जबाबदारी
३) प्राणीमात्रांवर दया करा
( शब्दर्यादा: २०० ते २५०)
गट- दुसरा -८ वी ते १० वी
विषय- १) अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज २) भारतीय संविधान आणि राष्ट्रीय ऐक्य
३) वाचन सर्वांगीण समृद्धीचा पाया
(शब्दमर्यादा- ४५०ते ५००)
गट-तिसरा महाविद्यालयीन (११ वी ते १५ वी विषय- १) लोकशाही टिकवा, देश वाचवा २)समाज प्रबोधनात प्रसार माध्यमांचे कार्य
३) मतदान माझा अधिकार
( शब्दमर्यादा: ६५० ते ७००)
जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांसाठी विज्ञानविषयक संशोधनात्मक निबंधलेखन स्पर्धा
विषय- विज्ञान अध्यापनातील माझे नाविन्यपूर्ण उपक्रम
(पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गातील कोणत्याही प्राथमिक शाळेतील शिक्षक सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतात) विजेत्या स्पर्धकांना नियोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध खालील पत्त्यावर दिनांक १५ डिसेंबर २०२२ पूर्वी पाठवावेत
कल्पना मलये (9673438239)
जि.प.शाळा कणकवली क्र. ५
शिवाजी नगर कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीसाठी संपर्क-राजेश कदम-9423832692/ 7057383982, तरी कै उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेऊन कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या स्तुत्य उपक्रमाला सहयोग द्यावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी केले आहे.