बांदा
शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित 13 व्या राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्ती पर गीत गायन स्पर्धेत गट क्रमांक एक मधून जिल्हा परिषद बांदा नं.1केंद्रशाळेतील समर्थ संदीप नार्वेकर याने परीक्षक निवडीतून राज्यात द्वितीय व सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने प्रेक्षक व परीक्षक निवडीतून राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला . तसेच शाळेतील पालक श्रद्धा संदीप नार्वेकर यांनी गट क्र. पाच मधून परीक्षक निवडीतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थी सर्वज्ञ वराडकर व समर्थ व श्रद्धा नार्वेकर या मायलेकाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर , केंद्र प्रमुख संदीप गवस विस्तार अधिकारी दुवा साळगावकर यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर , सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर ,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी, शितल गवस, प्राजक्ता पाटील, रंगनाथ परब, जे.डी.पाटील, प्रशांत पवार,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.