*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*
*जबाबदार कोण??*
सर्वांना आज सतावणारा पण कधीच उत्तर न सापडणारा शब्द आज आपल्यासमोर नागासारखा फणा काढून उभा आहे तो म्हणजे . आज महागाई. बेरोजगारी. गुंडगिरी. गुन्हेगारी. भ्रष्टाचार. आर्थिक लुबाडणूक. अमिषाचया नावाखाली विविध प्रकारांची लुट. टोळीयुद्ध. अवैध धंदे. खून. मारामाऱ्या. अपहरण. बलात्कार. हे सर्व आज रोजची बात झाली आहे. एकही दिवस मोकळा जात नाही त्या दिवशी एकही वरच्या विषयांची माहिती नाही. आपणं कधी विचार केला कां यासाठी जबाबदार कोण?? आहेत . तर सर्वात महत्वाचं आणि आपल्याला माहीत असणार उत्तर आहे ते म्हणजे नशा होय.
आज आपल्या गावात वाड्या वस्त्या. तालुका. जिल्हा. यामध्ये शाळा किंवा प्राथमिक दवाखाना नसेल एकादी तालिम नसेल. एखादे खेळांचे ग्राऊंड नसेल. गावात शुभंकरोती कलयाणम नसेल. पोलिस स्टेशन नसेल. तंटामुक्ती समिती नसेल. पण त्या गावात दारु विक्री. गुटखा पान मावा गांजा. अफू चरस हेराॅइन. अफिम. तंबाखू. पाऊडर पान. पाऊडर मावा. नशेच्या गोळ्या. असे विविध लोकांना तरुणांना बरबादी कडे नेण्यासाठी अलिशान दुकानें मात्र सदैव तयार असतात. मला एक कळत नाही शासन एकाबाजूला व्यसनमुक्ती. नशाबंदी. दारूबंदी . तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कडक आणि कठोर कायदे करतय आणि मग या सर्व अवैध धंद्यांना परवानगी कोण देत शासनच मग आपणांस तरुण पिढीला बाद करण्यासाठी शासनच जबाबदार आहे.
व्यसनाधीनता असा आजार आहे जो आज तरुणाईचा घात करणारा आहे. आज शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय मध्ये शिकणारी तरुण मुलं सकाळी काॅलेज शाळेला येताना घरातून पैशे आणून त्या पैशाचा वापर नशेची उत्पादन खरेदी करायला खर्च करतात. आपला एक स्टेट वाढविण्यासाठी किंवा मित्रात आपला रुदबा वाढविण्यासाठी विविध म्हंजे आजची पाऊडर नशा करताना दिसत आहेत. त्यामध्ये २०/४०/६०/१५०/ रुपयांची पाउडर पान मावा आज मार्केट मध्ये कोपरया कोपरयात झालेल्या पानपट्टी मध्ये सर्रास विक्री केलेलीं दिसतं आहे. संबंधित गावातील पोलिस स्टेशन ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचें याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं आहे. एवढंच काय पण काही शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी हे या नशेच्या व्यापारी लोकांचे रोजचेच कस्टमर आहेत. अशे नशेची विविध उत्पादने या अधिकारी व कर्मचारी यांना बंदच्या काळात सुध्दा हेंच विक्रेते उपलब्ध करून देतात म्हणूनच काय हे कोणीही अशा नशेचे पदार्थ विक्री विरोधात कारवाई करता नाही अस दिसत.
शाळेच्या भिंतीला लागून दारुसाठी जागा दिली जाते. शाळेच्या गेटवर अवैध धंदे चालतात. मग प्रशासन काय झोपलय कां?? या अवैध धंद्यांना लाईन्स कोण देत?? यांना संबंधित विभाग परवानगी देताना चौकशी करत नाही कां?? यांच्यामागे नेते आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे यांनाच आश्रय दिला जातो कां?? तंबाखूजन्य पदार्थ नशेचे पदार्थ व इतर तयार करण्याचे कारखाने यांचेच आहेत मग हे का बंद होऊ शकतं नाहीत कां?? मेडिकल मध्ये नशेच्या गोळ्या विक्री करण्याचे परवाने कोण देतं?? असं अनेक प्रश्न आज आपल्यापुढे आ वासून उभे आहेत.
व्यसन हा एक आजार आहे ज्याचा मेंदू आणि वर्तनावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला ड्रग्सचे व्यसन असते, तेव्हा तुम्ही ते वापरण्याच्या प्रतिकार करू शकत नाही, मग ते तुम्हाला कितीही नुकसान करीत असले तरीही. तंबाखू, अल्कोहोलपासून ते गांजा, ओपिओइड्स, हेरॉइन, बेंझोडायझेपाइन्स, मेथॅम्फेटामाइन, कोकेन, भांग, स्टिरॉइड्स सारखे अनेक विषारी अंमली पदार्थ वापरली जातात. देशात, भांग, हेरॉईन आणि अफू ही सर्वात जास्त वापरली जाणारी अंमली पदार्थं आहेत परंतु मेथॅम्फेटामाइनचा वापर देखील वाढत आहेत. ड्रग्सचे इंजेक्शन घेणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतात हेरॉईनचे दहा लाख वापरकर्ते आहेत, परंतु अनधिकृत अंदाजानुसार ५ दशलक्ष ही वास्तविक आकडेवारी आहे.
युनायटेड नेशन्स मधील ऑन ड्रग्ज अँड क्राइम्स (यूएनओडीसी) च्या वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२१ नुसार, गेल्या वर्षी कोविड-१९ महामारी दरम्यान जगभरात सुमारे २७५ दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा वापर केला, २०१० च्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली आहे. व्यसन करणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी १३ टक्के, म्हणजे ३६.३ दशलक्ष लोक अंमली पदार्थांच्या वापराच्या विकाराने ग्रस्त आहेत. ताज्या जागतिक अंदाजानुसार, ५ ते ६४ वयोगटातील सुमारे ५.५ टक्के लोकांनी गेल्या वर्षी किमान एकदा तरी अंमली पदार्थं वापरले आहे. असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर ११ दशलक्षाहून अधिक लोक अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेतात, त्यापैकी निम्मे हेपेटायटीस सी ग्रस्त आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीनुसार, बेकायदेशीर औषधांमुळे २०१७ मध्ये जगभरात सुमारे ७.५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. भारतातील अंदाजे मृतांची संख्या २२,००० होती. काही अंदाजानुसार, जागतिक अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यापार ६५० अब्ज डॉलर इतका आहे. २०१९ मध्ये भारतातील अंमली पदार्थांच्या वापराच्या प्रमाणात आणि नमुन्यावरील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, देशातील लोकसंख्येपैकी सुमारे २.१% (२.२६ कोटी लोक) ओपिओइड्स वापरतात ज्यात अफू, हेरॉइन आणि फार्मास्युटिकल ओपिओइड्सचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, १०-७५ वर्षे वयोगटातील सुमारे २.८% भारतीय (३.१ कोटी लोक) गांजा आणि चरस वापरत आहेत. गेल्या दशकात भारतात अंमली पदार्थांचे सेवन आणि दारूचे व्यसन दुपटीने वाढले आहे.
व्यसनाचा आहारी गेल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. डोळे लाल होणे, तोंडाची दुर्गंधी येणे, लोकांच्यात अंतर वाढणे. थुंकणयासाठी दारात बसणें. व्यसनाधीनता असणारे लोक यांची जागा चप्पल जवळ असते हे खरंच आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेत बदल, चिडचिडपणा, शिवीगाळ करणे, अस्वच्छता, शरीर आणि मन अनियंत्रित, अनावश्यक कुरकुर करणे, स्वतःशिवाय इतरांना महत्त्व न देणे, स्वत:मध्ये हरवणे, व्यसनासाठी चोरी करणे किंवा खोटे बोलणे, नाट्यमय देखावे करणे आणि सर्वात मोठा दोष नशेच्या अवस्थेत अयोग्य निर्णय घेणे हा आहे. जगातील बहुतांश गुन्हे हे नशेमुळे किंवा नशेच्या अवस्थेत होतात. अंमली पदार्थं माणसाच्या भावना, मन, निर्णय क्षमता, शिकवण आणि स्मरणशक्तीवर परिणाम करतात. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूमध्ये दीर्घकाळ होणारे बदल म्हणजे डिप्रेशन, आक्रमकता आणि मतिभ्रम सारखे विकार होऊ शकतात. अंमली पदार्थांचे व्यसन शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर दुष्परिणाम करते. तसेच इतर आरोग्य समस्या जसे की कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, मानसिक विकार आणि संसर्गजन्य रोग जसे की एचआईवी / एड्स, हिपॅटायटीस आणि क्षयरोग होऊ शकतात.
मादक पदार्थ : ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व तीपासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा , चरस (हशिश), विविध प्रकारची मद्ये वगैरे पदार्थाचा मादक पदार्थांत समावेश केला जातो.
अल्पवयीन मुलांना कोवळ्या आणि वय वाढीच्या काळात कोणतंही व्यसन मग ते मादक. अमली. किंवा अन्य कोणतेही व्यसन लागणे ही मुलांच्या आयुष्याची बरबादी करणारं असतं. यामध्ये व्यसनाधीन मुलांच्या स्वभावात खालील बदल झालेले आपल्या लक्षात येतात.
वर्तणुकीत अचानक बदल घडतो.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलांची शाळेत उपस्थिती कमी होऊ लागते.
अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन लागत नाही.
पॉकेटमनी वाढविण्यासाठी सतत पालकांकडे तगादा.
घरातील वस्तू हळूहळू गायब होणे.
जुने मित्र सोडून नवीन मित्र बनविणे.
बाथरुममध्ये जास्त वेळ घालविणे.
घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे.
डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे.
बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे.
भूक न लागणे.
वजन कमी होणे.
व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे.
निद्रानाश
व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे, अस्वस्थता, मानसिक आजार वाढतात.
यावर उपाय
पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्यांना चांगल्या वाईट गोष्टी समजावून सांगावया. आपण कोणासी मैत्री करावी याची सुध्दा जाणीव करून देणं गरजेचं आहे. मुलांना वाईट बोलन. सवता आपणं व्यसनापासून लांब राहणे. हे पालकांचे परम कर्तव्य आहे.
त्याच्याशी मित्र म्हणून वागा.
काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या.
त्याच्याशी प्रेमाने वागा…त्याला विश्वासात घ्या.
वाईट मित्रांची संगत करू देऊ नका.
वेळीच सावध करायला हवे.
शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे.
कोणत्याही मुलाला कमी लेखू नका.
तसे झाले तर ते व्यसनाकडे वळली जातात.
औषधोपचार
मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन
पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व तीपासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा , चरस (हशिश), विविध प्रकारची मद्ये वगैरे पदार्थाचा मादक पदार्थांत समावेश केला जातो
अफू, गांजा, कोकेन, हेरॉईन हे सर्वपरिचित पदार्थ. यातील अफूपासून गर्द, हेरॉईन तयार होते. मार्फिन हेसुद्धा अफूपासून तयार केले जाते. कोकोच्या पानापासून कोकेन तयार केले जाते. इतर अमली पदार्थामध्ये मेथॅक्युलॉन, अॅम्फेटामाईन, मेथअॅम्फेटामाईन आदींचा समावेश होतो. याशिवाय बटण गोळ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रायनॉक्सच्या गोळ्या, तसेच रेक्सकॉफ या खोकल्यावरील औषधाचा त्यात समावेश होतो.
अफू गुजरातवरून, तर चरस जम्मू-काश्मीरमधून देशभरात विकले जाते. गांजा हा सोलापूर, नाशिक आदी पश्चिम महाराष्ट्रातून आणला जातो, तर कोकेन तस्करीच्या माध्यमातून परदेशातून भारतात आणला जातो, असे अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सांगितले.
एलएसडी पेपर हा अमली पदार्थाचा आणखी एक प्रकार. ४० एलएसडी पेपर हे ६० हजार रुपयांना मिळतात. मुंबईत वांद्रे येथे नुकतीच एका तरुणाला एलएसडी पेपर बाळगताना अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत झालेली ही एकमेव कारवाई होती.
अमली पदार्थविरोधी शाखेचे (आझाद मैदान शाखा) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांनी सांगितले की, १ गॅ्रम कोकेन हे ३ हजार रुपयांना मिळते, तर हेच १ गॅ्रम एमडी अवघ्या १५० रुपयांना मिळते. म्हणजे ते कोकेनच्या वीसपटीने स्वस्त आहे. ऑनलाइनद्वारे अगदी एका क्लिकवर अगदी घरपोच एमडी पुरवले जाते. हे एमडी एका पुडीत मिळते. १० ते १५ पुडय़ांच्या एका सेटला बुक असे म्हणतात. एमडी घेतल्यावर दोन-दोन दिवस झोप येत नाही. ऊर्जा येते, लैंगिक उत्तेजना वाढते. एमडीचे सेवन करणारा एक वर्षही जगू शकत नाही. मुंबईत पोलिसांच्या अधिकृत आकेडवारीत एकूण ३ जणांचे मृत्यू एमडीमुळे झाले आहेत. अमली पदार्थाचे सेवन करण्यामागे अनेक कारणे असतात. जी गोष्ट वडीलधारे करतात त्यांचे अनुकरण करणे, नवनवीन गोष्टींचे आकर्षण वाढून त्याचा उपयोग करण्याची वृत्ती निर्माण होणे. यावेळी आपण काय करतो यांचे त्याना भानही नसते. मुळात या गोष्टी अज्ञानातच होतात. त्यामुळे हा व्यवसाय करणार्यांचे प्रमुख लक्ष ही अल्पवयीन मुले असल्याने त्यांना यात अडकवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील शाळां काॅलेज विद्यालय महाविद्यालय यांचे शिक्षक यांच्याशी अशा दुकानदार याची साठगाठ नसेल असं आपणं म्हणू शकत नाही. विविध सापळे रचले जातात. शाळा, कॉलेज यांच्या आजुबाजूला जे फेरीवाले, गाडेवाले असतात, ते मुलांना अनेक खाद्यपदार्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात अंमली पदार्थाची चटक लावू शकतात, उदा. पान, सिगारेट, विडी. गांजा. अफू. चरस. गुटखा. मावा. पाउडर पान. पाऊडर मावा. असे विविध नशेचे पदार्थ शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय यांच्या आवारात खाद्यपदार्थ विक्री करणारे लहान दुकानदार मुलांना बिस्किट यात किंचित प्रमाणात मादक पदार्थ मिसळले जातात. याचा परिणाम शेवटी ही मुले मूळ अंमली पदार्थाकडे वळतात. मग शासनाचा नियम आहे शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालये यांच्या आवारात किंवा 100 मिटर अंतराच्या आत अशा लोकांना आपली दुकाने चालविण्याची परवानगी कोण देतं त्यांच्या ध्यानात ही बाब आली नाही कां ??.
आजच्या आधुनिक काळात एक किंवा दोन मुले या संकल्पनेमुळे पालक आपल्या मुलांच्या पालन पोषणा संबंधी खूपच संवेदनशील असतात. वाढत्या स्पर्धेमुळे आपली मुले मागे राहू नयेत म्हणून त्यांच्या राहणीमानावर, शिक्षणावर अनिर्बंधपणे खर्च करतात. जे सुख आपल्याला मिळाले नाही, ते सुख आपल्या मुलांना मिळू देत . आपण करत असलेलें शारीरिक कष्टाचे काम यांच्या नशिबी येवू नये. त्यांना हक्काचे आणि प्रगती साधण्यासाठी उच्च माध्यमिक पदवीधर. शिक्षण मिळावे त्यांना नोकरी मिळावी त्याचा आणि मुलांचा पत्नी संसार चांगला व्हावा. ही भावना सर्वच पालकांमध्ये रूजलेली आहे. त्यामुळे लहान वयातच मोबाईल हातात येतो. दुचाकी वाहन चालवण्याची संमती मिळते. पॉकेटमनी म्हणून पैशांचा रतीब सुरू होतो. हा पैसा कसा खर्च होतो याचा हिशोब कधीच घेतला जात नाही. मुलं मित्राच्या संगतीने . दुसरा करतो म्हणून मी करतो. त्याला काय होतोय ही भावना मुलांच्या मनात रुजते आणि मुलं आपोआप व्यसनाकडे वळतात. आणि पालकांच्या विशवासातून खाली येतात. आपल्या जीवनाची बरबादी येथूनच सुरू होते.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859