कणकवली :
दैनिक सकाळ समूहाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे तहसीलदार श्री. रमेश पवार यांना जाहीर करण्यात आलेला ‘आयडॉल महाराष्ट्राचे कोकणरत्न’ पुरस्कार एका शानदार सोहळ्यात वितरीत करण्यात आला. सुप्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक श्री. सुनंदन लेले यांच्याकडून पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल सयाजी मध्ये हा सोहळा संपन्न झाला. गेले अनेक वर्ष महसूल सेवेत कार्यरत असणाऱ्या तहसीलदार श्री. पवार यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभारलेला ७५ फुटी ध्वजस्तंभ या सोबतच आपत्ती निवारण असो किंवा अन्य कोणतेही मदत कार्याचे काम असो कणकवली तहसीलदार हे नेहमीच अग्रभागी असतात. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका तहसीलदार श्री. पवार नेहमीच घेत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.